Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Latest Marathi Maharashtra Politics News Live Update: देश-विदेशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही याठिकाणी वाचू शकता.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal
Updated on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत

मनसे पक्षाचा महायुतीमध्ये सहभाग होणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. राज ठाकरे सोमवारी दिल्ली दौऱ्यावर असून ते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत.

मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत दाखल

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बैठकीसाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. सोमवारीच बिहारमधील जागावाटपर जाहीर झालेलं आहे.

निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याचा बीआरएसमध्ये प्रवेश

निवृत्त आयपीएस अधिकारी आरएस प्रवीण कुमार यांनी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला.

राज ठाकरेंची दिल्लीत भाजप नेत्यांसोबत बैठक सुरु?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिल्लीमध्ये भाजप नेत्यांसोबत बैठक सुरु असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार कळतंय. मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होईल, अशी शक्यता वर्तवली जातेय.

PM मोदींचा कोईम्बतूरमध्ये रोड शो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे रोड शो मध्ये सहभाग घेतला. त्यांच्यासोबत राज्य भाजपचे प्रमुख के. अन्नामलाई आणि केंद्रीय मंत्री एल. मुरुगनही देखील उपस्थित आहेत. या रोड शोसाठी परवानगी नाकारण्यात आली होती. अखेर मद्रास हायकोर्टाने काही अटी लावून पोलीसांना परवानगी देण्याचे आदेश दिले होते.

IPS विवेक सहाय यांची पश्चिम बंगालचे  डीजीपी म्हणून नियुक्ती

निवडणूक आयोगाने आज पश्चिम बंगालच्या डीजीपीला हटवल्यानंतर लगेच आयपीएस अधिकारी विवेक सहाय यांची पश्चिम बंगालचे पुढील डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला! आपचे सत्येंद्र जैन पुन्हा तुरुंगात रवाना

दिल्ली : न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दिल्लीचे माजी मंत्री आणि आपचे नेते सत्येंद्र जैन त्यांच्या निवासस्थानातून तिहार तुरुंगात रवाना झाले.

बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप

लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप झाले असून, भाजप 17 जागांवर, जेडीयू 16 जागांवर, एलजेपी (रामविलास) 5 जागांवर, हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा प्रत्येकी एका जागेवर लढणार आहेत.

पंतप्रधान मोदींकडून पुतिन यांचे अभिनंदन

व्लादिमीर पुतिन यांचे रशियन फेडरेशनच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आगामी वर्षांमध्ये भारत आणि रशियामधील विशेष आणि विशेषाधिकारित धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.

दिल्ली मद्य घोटाळ्यात अडकणार मोठे मासे

दिल्ली मद्य घोटाळ्याबाबत सीबीआयकडून एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. या प्रकरणात काही हायप्रोफाईल लोकांना अटक होण्याची शक्यता केंद्रीय तपास यंत्रणेने व्यक्त केली आहे.

IOA कडून कुस्तीची ए़ड हॉक समिती विसर्जित

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने भारतीय कुस्ती महासंघ (WFI) साठीची ए़ड हॉक समिती विसर्जित करण्याची घोषणा केली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने WFI वरील बंदी उठवल्यामुळे आणि निवड चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

विमा कंपन्यांना एफडीआयच्या माध्यमातून मिळाले ५३,९०० कोटी रुपये

थोड्याच वेळात CM शिंदेंची पत्रकार परिषद; लोकसभेचं जागा वाटप जाहीर होणार

थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये शिवसेनेचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडमध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल

मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडमध्ये आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिरूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. इशारा सभेत वापरलेल्या जेसीबीवर देखील कारवाईचे संकेत आहेत. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याबाबची माहिती दिली आहे.

Uddhav Thackeray: फडणवीसांना घरफोडीचं लायसन्स देऊन टाका- उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीसांना घरफोडीचं लायसन्स देऊन टाका, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना केली आहे. फडणवीसांनी एका मुलाखतीत बोलताना, मी पुन्हा आलो, तेही दोन पक्षांना फोडून आलो, असं वक्तव्य केलं होतं.

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून लुटण्याचा प्रयत्न- उद्धव ठाकरे

सध्या उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. वसमतमधील सभेत त्यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून लुटण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप करण्यात आला.

रस्ता खोदून ठेवल्याने वाशिमकर त्रस्त

वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात रस्त्यांची विकास काम अत्यंत संथ गतीने सुरु आहेत. रस्त्याचं काम अपूर्ण असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

मुख्तार अन्सारी यांच्या मुलाला जामीन मंजूर

शस्त्रपरवाना प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी याला जामीन मंजूर केला आहे.

भावना गवळींचे समर्थक वर्षा बंगल्यावर दाखल

भावना गवळी यांचे समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघावर शेकापचा दावा

सोलापुरातील लोकसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाने दावा केला आहे. या जागेवर अनिकेत देशमुख यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर होणार

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली जाऊ शकते. पहिल्या यादीत १० उमेदवारांची नावं असू शकतात.

विजय शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

विजय शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत, यावेळी शिंदे शिवतारेंची समजूत काढतात का? हे पाहण उतसुकतेचे ठरणार आहे.

दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगवास निश्चित

दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना सुप्रीम कोर्टानं झटका दिला असून त्यांची अटकपूर्व जामिनाची याचिका तसेच इतर सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्याचबरोबर तातडीनं आत्मसमर्पण करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. त्यामुळं सत्येंद्र जैन यांचा तुरुंगवास आता निश्चित मानला जात आहे.

Nagpur Crime: कामठीतील धक्कादायक घटना ,गतीमंद मुलीवर चौघांनी केला अत्याचार, आरोपींना अटक

नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षीय गतीमंद मुलीवर चौघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकाराने खळबळ उडाली असून पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधीच विधान हास्यासपद - अशोक चव्हाण

राहुल गांधीच विधान हास्यासपद आहे. मी कधीही सोनिया गांधींना भेटलो नाही. असे अशोक चव्हाण म्हणाले

Nagpur Local Made Guns: नागपूर बनतय देशीकट्ट्यांचा अड्डा, प्रकरणांमध्ये दुपटीने वाढ; दोन महिन्यांत ७० गुन्हे दाखल

Nagpur नागपुर शहरात देशीकट्ट्यांच्या तस्करीमध्ये वाढली असून नागपुरात दोन महिन्यांत ७० गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्यावर्षीच्या तुलनेत दोनच महिन्यांत हा आकडा दुपटीने वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागपूर देशीकट्ट्याचा अड्डा झाल्याचे चित्र आहे.

Ajit Pawar: अजित पवार आज दिल्लीला जाणार? महायुतीच्या जागावाटपाबाबत अंतिम चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी काल रात्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली होती. आज जागावाटपाबाबत दिल्लीत अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे.

building collapsed: दक्षिण कोलकातामध्ये पाच मजली इमारत कोसळली; ममता बॅनर्जी घटनास्थळी

पश्चिम बंगालमधील दक्षिण कोलकातामध्ये एक पाच मजली इमारत कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

Dharavi: अदानी समूहाकडून धारावीतील पुनर्विकास सर्वेला सुरुवात

धारावीतील पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाकडून सर्वेला सुरुवात झाली आहे. अदानी समूह आणि सरकारी अधिकारी सर्व्हेक्षणासाठी धारावीमध्ये दाखल झाले आहेत.

Sanjay Raut: देश राहुल गांधी यांना भावी पंतप्रधान म्हणून पाहतो- संजय राऊत

कालची मुंबईची सभा भव्य आणि उत्तम झाली. देश राहुल गांधी यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहात आहे. आम्ही सर्वजण राहुल गांधी यांच्यासोबत आहोत. भाजप भ्रष्टाचाराने बनलेला पक्ष आहे. राहुल गांधी खंबीरपणे लढणारे नेते आहेत, असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

Ajit Pawar: शेती करायला दिली म्हणजे तुम्ही मालक होत नाही; अजित पवारांच्या बंधुंचे टीकास्त्र

ज्या साहेबांनी चार वेळा उपमुख्यमंत्री केले. तरीसुद्धा म्हणायचे काकांनी माझ्यासाठी काय केले. असा काका मला असता तर मी सुद्धा खुश झालो असतो. साहेबांची वय आता ८३ झाले आहे. या वयात त्यांना सोडणे मला पटले नाही. आपण औषध घेतो त्याची एक्सपायरी डेट असते तशी काही नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. (संपूर्ण बातमी येथे वाचा)

Train derailed: राजस्थानमध्ये साबरमती-आग्रा सुपरफास्ट ट्रेनचे डब्बे रुळावरुन घसरले

राजस्थानच्या अजमेरमध्ये मदार रेल्वे स्टेशनजवळ साबरमती-आग्रा सुपरफास्ट ट्रेनचे डब्बे रुळावरुन घसरले आहेत. यात काहीजण जखमी झाले असून जीवितहानी झालेली नाही. रात्री १ वाजता हा अपघात घडलाय.

Sharad Pawar: शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

आज सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने शरद पवारांचा फोटो न वापरण्याचे आदेश अजित पवार गटाला दिले आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होतं हे पाहावं लागेल.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. रविवारी मुंबईतील शिवाजीपार्कवरील सभेत विरोधकांची ऐकी दिसून आली. यामुळे भाजप नक्कीच सावध झालेली असणार. उबाठा गटाकडून लोकसभेची तयारी सुरु झालीये. उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नाही. तो आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. आज सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने शरद पवारांचा फोटो न वापरण्याचे आदेश अजित पवार गटाला दिले आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होतं हे पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.