Latest Marathi News Update : एका क्लिकवर वाचा, दिवसभरातील सर्व अपडेट्स

Maharashtra Politics: दिवसभरातील देश-विदेश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला याठिकाणी वाचायला मिळतील.
Pune Rain
Pune Rain
Updated on

Ajit Pawar: पावसामुळे जनजीवन विस्कळीत; अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना

पुणे शहर आणि परिसरात आज सायंकाळी मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी मी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. तरी प्रशासनाच्या वतीनं तातडीनं उपाययोजना करण्याच्या तसंच पावसात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. या काळात नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे येत्या पाच दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्या अनुषंगानं राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. अशी पोस्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया साईटव केली आहे.

Pune Rain: पुण्यात कुठे किती पाऊस? जाणून घ्या एका क्लिकवर

शिवाजीनगर: 103 मिमी

सदाशिव पेठ : 93 मिमी

कोथरूड : 91 मिमी

सिंहगड रस्ता : 74 मिमी

पाषाण: 65 मिमी

बावधन: 48 मिमी

बिबवेवाडी: 56 मिमी

खराडी: 31 मिमी

एनडीए: 41 मिमी

वाघोली : 44मिमी

(सायंकाळी 7:15 वाजेपर्यंत)

Devendra Fadnavis: मोदींच्या शपथविधीसाठी फडणवीस दिल्लीत

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी 9 जून, रोजी 7.15 वाजता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

Landslide Mahad: महाडमध्ये दरड कोसळली

आज सायंकाळपासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अशात महाडमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

पावसामुळं सातारा-पुसेगाव वाहतूक दोन तास ठप्प

कोरेगाव शहर व परिसरात सुमारे दोन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. आझाद चौकात एका इमारतीवरील पत्र्याचे मोठे शेड अँगलसह येऊन पडल्यानं दोन ते तीन लोक शेडच्या पत्र्याखाली सापडून जखमी झाले आहेत. एका अत्यवस्थ व्यक्तीला सातारला हलवलं आहे.

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव 

साताऱ्यातील कोरेगाव शहर व परिसरात सुमारे दोन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

कोरेगाव शहर व परिसरात सुमारे दोन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. आझाद चौकात एका इमारतीवरील पत्र्याचे मोठे शेड ॲगलसह येऊन पडल्याने दोन ते तीन लोक शेडच्या पत्र्याखाली सापडून जखमी, एका अत्यवस्थाला सातारला हलवले, सातारा - पुसेगाव वाहतूक दोन तास ठप्प

लोहगावात पावसाचा जोर वाढला, विमानतळ रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक कोंडी

Summary

कर्वे पुतळा चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून रिक्षा दुचाकी व काही वाहने बंद पडली आहेत. लोहगावात पावसाचा जोर वाढला असून विमानतळ रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : इगो मीडियाच्या माजी संचालक जान्हवी मराठेंना अटक

मुंबई गुन्हे शाखेच्या एसआयटीने केली इगो मीडियाची पूर्व संचालक जान्हवी मराठेंना अटक. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन फेटाळल्या पासून गुन्हे शाखेचे अधिकारी होते जान्हवीच्या मागावर. गोव्यातून घेतलं गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात. जान्हवीसह कंत्राटदार सागर कुंभारला देखील करण्यात आली अटक. दुर्घटनाग्रस्त झालेलं होर्डिंग उभारण्याच कंत्राट सागरने घेतल्याचा आहे गुन्हे शाखेचा दावा. उद्या करणार दोघांना कोर्टात हजर. दुर्घटनेत १७ जणांचा झाला होता मृत्यू तर ७४ जखमी. जान्हवी मराठे डिसेंबर २०२३ पर्यंत इगो मिडियाच्या संचालक होत्या. त्यांच्याच काळात घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग उभारण्यात आलं होतं.

पुण्यात घरांमध्ये पाणी, वाहतूक कोंडीच्या घटना

पुण्यातील सुतारदरा परिसरात घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळतेय.

त्याचबरोबर कर्वेनगरच्या सोनल हॉलजवळच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे.

मुंबई बंगळूर महामार्गावर स्वामी नारायण मंदिरापासून मुंबईच्या दिशेने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

तसेच नवले पूल परिसरात जोरदार पाऊस बरसतो आहे.

शिवाजीनगर येथील दीप बंगला चौकात वादळी वाऱ्याने झाड पडल्याने चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनांना पाण्यातून मार्ग काढून पुढे जावे लागत आहे.

पुण्यात जोरदार पावसामुळं फ्लडसारखी स्थिती, तीन तास काळजी घेण्याचं आवाहन

विलेपार्ले परिसरात नरोत्तम निवास इमारतीला आग

विलेपार्ले पूर्व परिसरात आग लागल्याचं वृत्त आहे. विलेपार्ले पूर्वेकडील नेहरू रोड परिसरातील शिवसागर हॉटेल शेजारील नरोत्तम निवासला आग लागली आहे. इमारतीच्या इलेक्ट्रिक मीटरच्या बॉक्सनं शॉर्टसर्किटमुळं पेट घेतल्यानं ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून इमारतीत काही नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

Kothrud Pune : कोथरूड परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात

पुण्यात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. सध्या कोथरूड परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडत आहे. तर, वारजे माळवाडी महामार्गावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. दरम्यान, सिंहगड रस्ता परिसरातही जोरदार पाऊस सुरू असून धायरी फाट्याकडून पुण्याच्या दिशेला मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला महायुतीचे सर्व आमदार उद्या दिल्लीला जाणार - बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

- उद्या मोदी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत

- या शपथविधीबाबत विधिमंडळ गटाने प्रस्ताव ठेवला

- महायुतीचे सर्व आमदार उद्या दिल्लीला शपथविधीला जाणार

- उद्या महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष साजरा केला जाईल

- बुथपर्यंत जल्लोष साजरा करण्याचा प्रयत्न

- उद्याचा जल्लोष विकसित भारताचा

- दुसरा ठराव देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल होता

- फडणवीसांनी सरकारमध्ये काम न करता पक्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली

- ही भावना त्यांनी मागे घ्यावी भूमिका मागे घ्यावी, त्यांनी सारकारामध्येच राहून महाराष्ट्रासाठी काम करावं असा ठराव विधिमंडळ गटाने केला आहे, काही जिल्ह्यांतून देखील ठराव आले आहेत

-देवेंद्रजी शिवाय महाराष्ट्र अधुरा आहे ही आमची भावना, त्यांनी सरकार आणि संघटनेत काम करावं असं ठराव आम्ही मांडला आहे, ते आमच्या ठरावाला मान्य करतील.

जनतेने देशात पुन्हा मोदीजींवर आणि एनडीएवर विश्वास दाखवला - देवेंद्र फडणवीस

आज आपल्या विधीमंडळ गटाची बैठक आयोजित केली होती. बैठक आयोजित करताना आपल्या मनात आनंद देखील आहे. कालच देशाच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे नेहरुजींच्या नावावर असणाऱ्या रेकाॅर्डची बरोबरी करणारे मोदीजींची एकमताने पंतप्रधान पदासाठी निवड केली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण एकत्र आलोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. देशात पुन्हा मोदीजींवर आणि एनडीएवर विश्वास दाखवला. आपण मात्र तो वाटा २०१४, २०१९ प्रमाणे उचलू शकलो नाही याचं दु:ख देखील आहे. पुन्हा एकदा स्ट्रॅटर्जी आखावी याचा निर्धार केलाय, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इथे क्लिक करा

Delhi Police : दिल्लीत उद्या शपथविधी सोहळा; पोलिसांकडून सुरक्षेची तयारी सुरु

दिल्लीत नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. दिल्लीत 9 जून रोजी शपथविधी होणार आहे. त्यासाठी दिल्ली पोलिसांकडून सुरक्षेची तयारी सुरु झाली आहे. वाहतुकीच नियोजन आणि सुरक्षेचा आढावा घ्यायला सुरुवात झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

NEET परीक्षेचा पेपर लीक? महासंचालक सुबोध कुमारांनी आरोप फेटाळले

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) च्या अनेक परीक्षार्थिंनी अनियमितता आणि गुणांच्या खैरातीमुळे 67 उमेदवार परीक्षेत प्रथम क्रमांकावर आल्याचा आरोप केले आहेत, त्याचे महासंचालक सुबोध कुमार यांनी खंडन केले आहे. कोणताही पेपर फुटला नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

अयोध्येतील जनतेचे मी आभार मानतो - समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव

लखनौ : अयोध्या लोकसभा मतदारसंघातून सपाच्या विजयाबाबत समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव म्हणाले, "मी (अयोध्येतील) लोकांचे आभार मानतो. जनतेनी समाजवादी पक्षाला दिलेल्या आशीर्वादाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे त्यांनी नमूद केले आहे.

राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते? काँग्रेस कार्यकारिणीत ठराव मंजूर

काँग्रेस कार्यकारिणीने (CWC) राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनवण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पक्षाचे संघटनेचे प्रभारी सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 'सीडब्ल्यूसीने एकमताने राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावण्याचे आवाहन केले. संसदेत या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी राहुलजी योग्य व्यक्ती आहेत.'

Kolhapur Rain : कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी; पुढील 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 9, 10 आणि 11 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे. पश्चिम घाट माथ्यासह जिल्ह्याला दक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली. जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुढील 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Mokhada मोखाड्यात वादळी पावसाचा धुमाकूळ; विजेच्या धक्क्याने 8 जनावरांचा मृत्यू

मोखाडा Rain : मोखाड्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात झालेल्या पावसात, विजेचा धक्का बसून 8 जनावरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली आहे. तालुक्यातील भोवाडी येथील सकऱ्या नवश्या सुनाड याचे  3  बैल व 2  गायी, शिवराम जाना सोरे  -  1  बैल, संदीप सोन्या पाघारी  -  1  बैल आणि परशुराम महादू पढेर या शेतकर्यांचा  1  बैल असे एकूण  6  बैल आणि  2  गायींचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच तालुक्यातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. 

Sangli Police : मिरजेत बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त; सांगली पोलिसांकडून कारवाई

सांगली पोलिसांनी 1 लाख 90 हजारांच्या बनावट नोटासह नोटा छापण्याची 2 लाखांची मशीन, असा 3 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अहद शेख असे बनावट नोटा छपाई करणाऱ्या इसमाचे नाव आहे. 50 रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करण्यात येत होती. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केलीये.

Kolhapur Accident : डंपरच्या धडकेत पती पत्नी जागीच ठार

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील बोरपाडळे इथे डंपरच्या धडकेत पती पत्नी जागीच ठार झाले आहेत. दुचाकी ॲक्टीव्हा गाडीला डंपरने जोरदार धडक दिल्याने मारुती रामचंद्र महाजन आणि सुगंधा मारुती महाजन हे पती पत्नी जागीच ठार झाले.

प्रफुल्ल पटेल उद्या घेणार शपथ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे एनडीए सरकारमध्ये रविवारी शपथ घेणार आहेत. 'टीव्ही ९ मराठी'ने हे वृत्त दिले आहे.

नितीश कुमारांना पंतप्रधान पदाची होती ऑफर- के.सी. त्यागी

इंडिया आघाडीने नितीश कुमारांना पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, असा खुलासा जेडीयूचे नेते केसी त्यांगी यांनी केला आहे. परंतु नितीश कुमारांनी मोदींना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यागी म्हणाले.

Modi Oath Ceremony: मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला लावणार हजेरी

नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभाला अनेक देशांचे प्रमुख हजर असणार आहेत. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू हे देखील उपस्थिती लावणार आहेत.

Manoj Jarange Patil: मी उपोषण मागे घेणार नाही असं सरकारला कळवलंय- मनोज जरांगे

सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांची अंबड तहसीलदारांनी भेट घेतली आहे. यावेळी, मी उपोषण मागे घेणार नाही असे सरकारला कळवले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असं जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil: अंबडच्या तहसीलदार मनोज जरागेंच्या भेटीला, चर्चा सुरु

मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी आणि त्यांची समजूत काढण्यासाठी अंबडच्या तहसीलदार अंतरवाली सराटी येथे दाखल झाल्या आहेत.

Solapur: सोलापुरात भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार म्हणून पेढे वाटप

सोलापुरात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार म्हणून पेढे वाटप करण्यात येत आहे. तसेच रस्त्यावर जल्लोष करुन आनंद व्यक्त केला जात आहे.

Mumbai News: कुर्ल्यात पूर्व वैमनस्यातून एकाची हत्या

कुर्ल्यात पूर्व वैमनस्यातून एकाची हत्या हत्या करण्यात आली आहे. पाच जणांना चुनाभट्टी पोलिसांनी अटक केली आहे. अदनान कुरेशी नावाच्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर त्याचा भाऊ इम्रान आणि काक आरिफ जखमी झाले होते. आरोपी आणि जखमी एकाच कुटुंबातील आहेत.

Kolhapur News: सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी मारलं कुठं; कोल्हापुरमध्ये बॅनरबाजी

सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी मारलं कुठं, असा मजकूर लिहिलेले बॅनर कोल्हापूरमध्ये लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे शरद पवार गटाने ही बॅनरबाजी केली आहे.

इलॉन मस्कने केले मोदींचे अभिनंदन, मोदी भारतात 'उत्साहक काम' करण्यासाठी उत्सुक आहेत, असे मस्क यांनी सांगितले.

लोकसभा २०२४ ची निवडणूक जिंकल्याबद्दल इलॉन मस्क यांनी मोदींचे अभिनंदन केले.

Maldives: मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाचे निमंत्रण स्वीकारले

Maldives: मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान आणि भारत सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाचे निमंत्रण स्वीकारले आहे.

Manoj Jarange Patil: , आमरण उपोषण करणारच,जरांगे पाटील ठाम

मी माझ्यावर मतावर ठाम, आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange Patil : जरांगेंच उपोषण झालं सुरु

मनोज जरांगे पाटीलांच उपोषण सुरु झालं आहे.

Omraje Nimbalkar: सत्काराला हार तुरे ऐवजी वह्या पुस्तके द्या; खासदार ओमराजेंच्या आवाहनाला कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद

सत्काराला येताना हार तुरे आणण्या ऐवजी वह्या पुस्तके शालेय साहित्य आणावे ,असे आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केले होते. या आवाहनाला कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

Nashik Rain: नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; अनेक घरांचे पत्रे उडाले

करंजाडी खो-यात सायंकाळी सहाच्या सुमारास वीजेच्या कडकडाटसह वादळी वारा व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळात अनेक घरांचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Sambhaji Nagar: संभाजीनगरमध्ये पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा

जोरदार वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह संभाजीनगरमध्ये जोरजार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Mumbai local News: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, नागरिकांचे होणार हाल

Mumbai News: उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता.९) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.