Crime News: खामगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर; पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्‍नचिन्ह

खामगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर; पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्‍नचिन्ह
Crime News: sakal
Updated on

Buldhana Crime: शहर व जिल्ह्यांमध्ये खाकीचा धाक कमी झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून खामगाव शहरासह तालुक्यात एकामागोमाग चोरी, महिलांवरील अत्याचार, पैशांच्या वादातून हाणामाऱ्या तर कधी खून व आता कटर मारून पैसे पळविल्याची घटना.

सतत घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वजण दहशतीखाली वावरत आहेत. दरम्यान यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

खामगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर; पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्‍नचिन्ह
Nashik Cyber Crime: तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहे, पैसे भरा नाहीतर...म्हणत सायबर भामट्याने युवकाला घातला 10 लाखांना गंडा

बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे खामगाव शहराची ओळख आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरात सातत्याने चोरी, हाणमारी, खून, विनयभंग, हल्ल्या सारख्या गंभीर घटना घडत असल्याने शहरात कायद्या व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेल्या १५ दिवसांपुर्वी वाडी व अमृत नगर भागात एकाच रात्री चोरट्यांनी सात ठिकाणी घरफोडी करून हात साफ केला होता. त्यानंतर शहरातील इतरही ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस आल्या.

अनेक नागरिकांचे मोबाईल, दुचाकी चोरी गेल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. तसेच हाणामारी, विनयभंग, अवैधरित्या दारू विक्री, गुटखा विक्री, वरली मटका, जुगार आदी अवैध धंदे शहरात मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. तर गेल्या तीन दिवसांपुर्वी येथील बसस्थानकासमोर हॉटेल चालकाचा चौघांनी धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली.

खामगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर; पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्‍नचिन्ह
Nashik Crime Rate Hike: अवैध धंद्यांमुळे शहरात बोकाळली गुन्हेगारी! शहर पोलिसांचा राहिला ना धाक; हाणामारी, चोऱ्या, घरफोड्यात वाढ

तसेच ता.२९ रोजी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नेहरू कॉम्प्लेस मधील भाजप कार्यालयापाठीमागील सरकारी दवाखाना परिसरातील मुत्री घरात लघुशंकेसाठी आलेल्या युवकावर एकाने कटर मारून व डोक्यात विट घालून खिशातील ३ हजार रूपये हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली. सातत्याने घडणाऱ्या क्राईमच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तर या घटना रोखण्यात पोलिसांना सपसेल अपयश आले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. तर पोलिस प्रशासन व अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच हे अवैध धंदे बिनबोंभाट सुरू असून अवैध धंद्यामुळेच तरूण पिढी व्यसनाधिन होत चालली आहे. तसेच अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. या अवैध धंद्यामुळेच शहरात क्राईम वाढला चालला आहे. याचा त्रास मात्र शहरवासियांना होत असून याकडे लक्ष देणार तरी काेण असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.

खामगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर; पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्‍नचिन्ह
Crime News: दरोडा टाकण्यापूर्वीच दरोडेखोर जेरबंद!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.