Laxman Hake: लक्ष्मण हाके उपोषण मागे घेणार? वाचा, बैठकीत काय काय घडले

OBC Reservation: दरम्यान सरकारच्या या शिष्ठमंडळात छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांचा समावेश आहे.
OBC Reservation
OBC Reservation esakal
Updated on

जालन्यातील वडीगोद्रीत मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये यासह विविध मागण्यांसाठी गेल्या 9 दिवसांपासून लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. आज सरकारचे शिष्ठमंडळ त्यांची भेट घेणार आहे. जर यामध्ये हाकेंच्या मागण्यांवर सरकारने समाधानकारक तोडगा काढला तर ते उपोषण मागे घेऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

सरकारचे शिष्ठमंडळ आज पुणे जिल्हाधिकारी आवारात उपोषणाला बसलेल्या ओबीसी आंदोलकांची पहिल्यांद भेट घेणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता हे शिष्ठमंडळ वडीगोद्रीत उक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.

दरम्यान सरकारच्या या शिष्ठमंडळात छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांचा समावेश आहे.

OBC Reservation
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होताच सरकारनं घेतली महत्त्वाची भूमिका; CM शिंदे म्हणाले, 'हा प्रकल्प जनतेवर थोपविणार...'

समा टीव्हीच्या वार्ताहराशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, "काल आमची सरकारच्या शिष्ठमंडळाशी भेट झाली. त्यामध्ये सरकारकडून आणच्या दोन मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. परंतु आमच्या आणखी दोन मागण्यांवर सरकारकडून उत्तर आलेले नाही. त्यामुळे आज शिष्ठमंडळ काय घेऊन येतेय हे पहावे लागेल. त्यानंतर आम्ही आमची भूमिका ठरवणार आहे."

OBC Reservation
Vijay Wadettiwar : सत्तेवर येताच तोडगा काढू ,वडेट्टीवार;मराठा व ओबीसी समाजाला एकत्र आणू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.