Laxman Hake : ''सरकार काठावर पास, चारपैकी दोनच मागण्या मान्य.. आंदोलन थांबवत नाही'' लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले?

उपोषण स्थगित केल्यानंतर माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, सरकारने दोन मागण्या मंजूर केल्या असून दोन मागण्या तांत्रिक कारणांमुळे मंजूर केल्या नाहीत. आम्ही बोगस कुणबी नोंदींबाबत ऑब्जेक्शन घेतलं होतं, त्यावर सरकारने खोटे कुणबी देणारे आणि घेणारे दोघांवर कारवाई करु, असं आश्वासन दिलं आहे.
Laxman Hake-Manoj Jarange
Laxman Hake-Manoj Jarangeesakal
Updated on

OBC Reservation : ओबीसी आरक्षण बचावासाठी मागच्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके यांनी शनिवारी आपलं आंदोलन स्थगित केलं. सरकारने आपल्या दोन मागण्या मान्य केल्या असून दोन मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे सरकार काठावर पास झाल्याचं हाके म्हणाले.

उपोषण स्थगित केल्यानंतर माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, सरकारने दोन मागण्या मंजूर केल्या असून दोन मागण्या तांत्रिक कारणांमुळे मंजूर केल्या नाहीत. आम्ही बोगस कुणबी नोंदींबाबत ऑब्जेक्शन घेतलं होतं, त्यावर सरकारने खोटे कुणबी देणारे आणि घेणारे दोघांवर कारवाई करु, असं आश्वासन दिलं आहे.

Laxman Hake-Manoj Jarange
Anupam Kher Robbery Case : अनुपम यांच्या ऑफिसमध्ये चोरी केल्याबद्दल दोन जणांना अटक

पुढे बोलताना हाके म्हणाले की, ज्या सरकारने प्राधान्यक्रमाने कुणबी प्रमाणपत्र इश्यू केले त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. हे आंदोलन आम्ही थांबवलेलं नसून स्थगित केलेलं आहे. सगेसोयऱ्यांच्या बाबतीत आलेल्या हरकतींवर सरकराने योग्य तो निर्णय घेऊन श्वेतपत्रिका काढावी.

Laxman Hake-Manoj Jarange
HDFC Bank: एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; UPI व्यवहार केल्यास SMS येणार नाही, काय आहे कारण?

''पंचायतराज मधलं ओबीसींचं ५६ हजार जागांचं रिझर्व्हेशन गेलेलं आहे.. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेणार का, याचं उत्तर सरकारने द्यावं. याबाबत भूमिका स्पष्ट करावी. आपल्या आंदोलनामुळे शासनाचं लक्ष वेधलं आहे.. ओबीसींच्या मागण्यांबाबत सरकार काठावर पास झालं आहे.'' असं म्हणत हाकेंनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.