Laxman Hake : ओबीसी आरक्षणात जरांगेंची घुसखोरी : हाके

राज्यात चारशेहून अधिक जाती ओबीसी समाजात मोडतात. मनोज जरांगे यांच्याकडून ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली जात आहे. राज्यातील प्रस्थापितांनी जरांगे यांना समोर केले आहे. संविधानात आरक्षणाचे धोरण ठरलेले आहे.
Laxman Hake
Laxman Hakesakal
Updated on

आष्टी (जि. बीड) : ‘‘राज्यात चारशेहून अधिक जाती ओबीसी समाजात मोडतात. मनोज जरांगे यांच्याकडून ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली जात आहे. राज्यातील प्रस्थापितांनी जरांगे यांना समोर केले आहे. संविधानात आरक्षणाचे धोरण ठरलेले आहे.

त्यामुळे ओबीसी आरक्षण बचाओ जनआक्रोश यात्रा जागरूकता करत आहे,’’ असे ओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी सांगितले. आष्टी येथील विश्रामगृहात बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रा. हाके म्हणाले की, मनोज जरांगे यांचे उपोषण बेकायदा व घटनाबाह्य आहे. आंदोलनाच्या माध्यमातून घटनात्मक चौकट उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. आरक्षण मागणारा, शासन व्यवस्था वेठीस धरणारा मागास असू शकतो का? सरकार सत्यापासून दूर पळाले, तर जरांगे नावाचे भूत मानगुटीवर बसेल, अशी टीकाही त्यांनी केली. आंदोलनाच्या माध्यमातून पंचायतराजमधील ओबीसींचे प्रतिनिधित्व संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही लढाई आरक्षण गरजवंतांची नसून वर्चस्वासाठीची आहे, असे प्रा. हाके यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.