NCP Politics: 'मलाही राष्ट्रवादी आणि पवार यांच्या भूमिकेबाबत शंका वाटतेय', 'या' नेत्यांने उपस्थित केली शंका

'नातेसंबंध असले तरी याबाबत स्पष्टता हवी', असंही या नेत्याने म्हंटलं आहे
NCP Politics
NCP PoliticsEsakal
Updated on

Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर आमदारांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला. त्याचबरोबर मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत फुट पडली आणि दोन गट निर्माण झाले. त्यानंतर अजित पवारांच्या भूमिकेला आपला पाठिंबा नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. मात्र त्यांच्यात सुरू असणाऱ्या गाठीभेटींमुळे त्याच्या भूमिकेबाबत अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत.

दरम्यान संपुर्ण प्रकरणावर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी अशीच शंका व्यक्त केली आहे. मलाही राष्ट्रवादी आणि पवार यांच्या भूमिकेबाबत शंका वाटत आहे असं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. नातेसंबंध असले तरी याबाबत स्पष्टता हवी, ती भूमिका यातून सध्या तरी स्पष्ट दिसत नाही त्यांनी कठोर भूमिका घ्यावी असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

NCP Politics
Weather Update: मुंबईत पावसाच्या तुरळक सरी, विदर्भाला यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज

तर 'अ ला विरोध करायचा म्हणून ब सोबत जाणं योग्य आहे. या मताचा मी नाही. आमचा महाविकास आघाडीचा अनुभव वाईट आहे', असंही राजू शेट्टी पुढे म्हणाले आहेत.

राजू शेट्टी यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी गडकरी यांच्याशी शेट्टी यांनी शेती प्रश्नाच्या विविध मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच इथेनॅालच्या किंमत वाढीसह साखर निर्यातीच्या धोरणावर केंद्र सरकारनं मार्ग काढावा अशी मागणीही राजू शेट्टी यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. त्यानंतर ते बोलत होते.

NCP Politics
Mumbai Police: ...अन् तो पोलीस स्वतःच झाला रुग्णवाहिका, सतर्कतेचे सर्व स्तरातून होतंय कौतुक

रविकांत तुपकर यांच्याबाबत निर्णय घेणारा मी नाही

रविकांत तुपकर यांनी मला पत्र लिहिलं आहे. पण, निर्णय घेणारा मी नाही. ते पत्र मी समितीकडे पाठवलं आहे. समितीने मलाही काही प्रश्न विचारलेत त्याची उत्तरे मी देईल. मला त्यात मान अपमान वाटत नाही, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

NCP Politics
Video Viral: अंधेरीतील मंदिरात महादेवाचा नंदी पितोय दूध, पाणी; अफवेमुळे मंदिरात नागरिकांची तुफान गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.