‘CCTV’मधून नेत्यांचे स्ट्राँग रूमवर लक्ष! त्रिस्तरीय पोलिस बंदोबस्तात ‘ईव्हीएम’; 4 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येकी 3 स्ट्राँग रूम असून त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्या ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून स्ट्राँग रूमवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे पदाधिकारी गोदामाबाहेर मुक्कामी आहेत.
‘CCTV’मधून नेत्यांचे स्ट्राँग रूमवर लक्ष! त्रिस्तरीय पोलिस बंदोबस्तात ‘ईव्हीएम’; 4 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी
Updated on

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर सोलापुरातील रामवाडी गोदामातील स्ट्राँग रूममध्ये ‘ईव्हीएम’ ठेवण्यात आल्या आहेत. सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येकी तीन स्ट्राँग रूम असून त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्या ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून स्ट्राँग रूमवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे पदाधिकारी काही दिवसांपासून गोदामाबाहेर मुक्कामी आहेत.

लोकसभेची मतमोजणी ४ जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी १४ टेबल असणार आहेत. माढा लोकसभेच्या मतमोजणीसाठी देखील तेवढेच टेबल असतील. सध्या ‘ईव्हीएम’ ठेवलेल्या स्ट्राँग रूमजवळच मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून दीड हजार अधिकारी- कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. सध्या ‘ईव्हीएम’ ठेवलेल्या स्ट्राँग रूमबाहेर त्रिस्तरीय पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सुरवातीला राज्य पोलिस, मध्यभागी राखीव पोलिस आणि स्ट्राँग रूमजवळ केंद्रीय पोलिस आहेत. २४ तास त्यांच्याकडून त्याठिकाणी बंदोबस्त दिला जात आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीनांही गोदामाच्या गेटजवळ मंडप मारून देण्यात आला आहे. रूममधील सीसीटीव्हीमधील हालचाली त्यांना त्याठिकाणी पाहता येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, स्ट्राँग रूममध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्याठिकाणी जाता येत नाही, असेही निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

एखादे ‘ईव्हीएम’ न उघडल्यास ‘व्हीव्हीपॅट’चा पर्याय

काही तांत्रिक बिघाडामुळे मतमोजणीवेळी एखादे ईव्हीएम प्रयत्न करूनही उघडत नाही. यापूर्वी अनेकदा अशा अडचणी आल्या आहेत. ‘ईव्हीएम’मधील मतांची मोजणी करताना एखादे मशिन उघडेच नाही तर त्यावेळी ‘व्हीव्हीपॅट’ मशिनमधील पक्षनिहाय चिठ्ठ्या मोजून त्या मशिनचा हिशेब सर्वांसमोर मांडला जातो. त्यामुळे एखादे ‘ईव्हीएम’ मतमोजणीवेळी उघडले नाहीतर काहीही अडचण येत नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

मतमोजणी आठ वाजता सुरू; सायंकाळी सहापर्यंत संपेल मोजणी

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आता सात दिवसांवर असून ४ जूनला सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. दीड हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. त्या दिवशी अंदाजे सायंकाळी सहा ते साडेसहापर्यंत मतमोजणी संपेल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.