Maharashtra Politics: पवार, ठाकरेंना सोडून काँग्रेस एकट्याने निवडणूकांची तयारी करतयं?

महाराष्ट्राचं राजकारण सध्या न समजणारं झालंय
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal
Updated on

महाराष्ट्राचं राजकारण सध्या न समजणारं झालंय. पक्षातल्या आमदारांनाच काय कार्यकर्त्यांना सुद्धा कळतं नाही की आपला नेता कोणता... प्रचार कोणाचा करायचा आणि विरोध कोणाचा? बंड फोडाफोडी झाली ती शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पण या सगळ्यात काँग्रेस मात्र हुशारीने खेळत निवडणूकीची तयारी करतयं. त्यामुळे जाणून घेऊ काँग्रेसचा प्लँन नेमका काय? (Latest Marathi News)

२०१९ ची विधानसभा निवडणूक शिवसेना भाजप युतीत एकत्र लढली आणि काँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र लढली. निकाल शिवसेना भाजपच्या बाजूने लागला. काँग्रेस- राष्ट्रवादी विरोधात गेली. पण मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजपमध्ये बिनसलं आणि २५ वर्षांची युती तुटली. पण राज्यात महाविकास आघाडीच्या रुपाने शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादीचं नवीन समीकरण पहायल मिळालं आणि भाजप विरोधात. पण अडीच वर्ष सरकारमध्ये राहिल्यानंतर पुन्हा महाविकास आघाडी फुटली अन् भाजपने एकनाथ शिंदेंना फोडून सरकार स्थापन केलं. ते होतं नाही तर वर्षभरानंतर विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार सुद्दा सत्तेत सामील झाले. शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या या सगळ्या राजकारणात कोंडी झाली ती काँग्रेसची.(Latest Marathi News)

Maharashtra Politics
Shivaji Maharaj Statue: कर्नाटकातला शिवरायांचा पुतळा तातडीनं बसवा अन्यथा महाराष्ट्रात.. भाजप नेत्याचा काँग्रेसला कडक इशारा

पण एकीकडे जिथे शिवसेना राष्ट्रवादी फुटली, भाजपच्या नेत्यांमध्ये मंत्रीपदावरून नाराजी आहे. तिथे काँग्रेसचे आमदार मात्र आपल्या पक्षासोबत कायम राहिले. त्यात विरोधीपक्षनेते पद देखील काँग्रेसच्याच विजय वडेट्टीवार यांच्याकडे गेलं. त्यामुळे आता विरोधीपक्ष म्हणून काँग्रेस कामाला लागलीये आणि कोण आपल्या सोबत कोण आपल्या विरोधात याचा विचार न करता एकट्याने निवडणूकांची तयारी करतयं.

काँग्रसेच्या या भुमिकेमागे अनेक कारण आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भाजप विरोधात,मोदी सरकारविरोधात लढायचं, त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर इंडीयाचं नेतृत्व एकप्रकारे काँग्रेस करतंय आणि त्यांच्या मदतीला देशभरातून अनेक विरोधी पक्षनेते आलेत आणि तसा प्रतिसाद देखील मिळतोय.(Latest Marathi News)

दूसरं महत्वाचं कारण म्हणजे राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे पडसाद संपूर्ण भारतात उमटलेत. ज्याचा परिणाम आणि फायदा अर्थात महाराष्ट्रातही दिसुन येण्याची शक्यता आणि संधी राज्यातील काँग्रेस नेते सोडणार नाहीत.

Maharashtra Politics
Uddhav Thackrey: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ३५ वर्षापासून नगरसेवक असलेल्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

राज्याबद्दल बोलायचं झालं तर, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाविकास आघाडी म्हणून एकत्र दिसणारे तीनही पक्ष म्हणजे ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विस्कळीत झाली. उदाहरण सांगायचं तर वज्रमुठ सभा जी ३ ठिकाणी झाली, त्यानंतर राष्ट्रवादी फुटली आणि वज्रमुठ सभा बंद झाली. शिवसेना फुटीनंतर तरी महाविकास आघाडी एकत्र काम करत होती. पण अजित पवारांच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर तर महाविकास आघाडी फक्त नावापुरती राहिली की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.(Latest Marathi News)

त्यात अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार गट देखील त्याच वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यात अजित पवार आणि शरद पवारंच्या गुप्त भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलयं.

Maharashtra Politics
Ajit Pawar: पालकमंत्री पदावरून नाराजी? मुख्यमंत्र्यांच्या डिनर पार्टीला अजित पवारांच्या गैरहजेरी मागे कारण काय

स्वत: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की, अजित पवारांनी शरद पवारांना सत्तेत येण्याची ऑफर दिलीये त्यासाठी बदल्यात शरद पवार, सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद तर जयंत पाटलांना राज्यात मंत्रीपद देण्याचं साटलोट झाल्याचं बोलल गेलं.

त्याला विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांनी दूजोरा दिला आणि शरद पवारांना सोबत घेतल्याशिवाय अजित पवारांना मुख्यमंत्रीपद देणार नाही, असं मोदींना सांगितल्याचं वडेट्टीवरांनी सांगितलं. त्यामुळे चर्चांना वेग आला आणि राहिला प्रश्न ठाकरे गटाचा तर राष्ट्रवादीचे बंड ठाकरेंना पचलेलं नाही. त्यांनी सामना मधून आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यात निवडणूकांच्या दृष्टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत ठोस काही बोलणं करताना सुद्धा ठाकरे गट दिसत नाहीये त्यामुळे कदाचित आपलं आपलं बघण्याच्या विचारात आहे.

त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक राजकारण, नेत्यांच्या बंडामुळे आणि बदलत्या राजकीय भुमिकेचा परिणाम स्थानिक राजकारणावर होऊ नये म्हणून काँग्रेस आपल्या नेत्यांना दूखवू शकतं नाही. उदाहरण द्यायच तर पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या माढा आणि कोल्हापुरात काँग्रेस आपला उमेदवार उतरवण्यावर ठाम आहे. त्यामुळे शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये बिनसू शकतं या आणि अशा अनेक कारणांमुळे काँग्रेस एकट्याने आगामी लोकसभा आणि विधानसभेची तयारी करतयं.(Latest Marathi News)

त्यातलाच एक भाग म्हणजे काँग्रेसच्या हर एक नेत्यांनी हर एक मतदारसंघ पालथा घालून ग्राऊंडवरची परिस्थिती पाहिली आणि त्या अनुशंगाने पुढची आखणी करणार असल्याचं स्पष्ट केले. त्यामुळे कोणी सोबत असो वा नसो काँग्रेस आपली तयारी तर सुरु केलीये. त्यात किती यश मिळतयं हे येणाऱ्या निवडणूकाच सांगतील.

Maharashtra Politics
NCP Politics: 'मलाही राष्ट्रवादी आणि पवार यांच्या भूमिकेबाबत शंका वाटतेय', 'या' नेत्यांने उपस्थित केली शंका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.