Vidhan Parishad Election : ...तोपर्यंत गणपत गायकवाड यांना मतदान करता येणार नाही; निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय

Ganpat Gaikwad News : काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग कामाला लागलं असून आयोगाकडून नियमांचा आढावा घेण्यात काम सुरू आहे. निवडणूक अधिकाऱ्याने यावर राज्य निवडणूक आयोगाकडून रिप्लाय मागवला आहे.
Ganpat Gaikwad News
Ganpat Gaikwad Newsesakal
Updated on

मुंबईः विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत २४० पेक्षा जास्त आमदारांनी आपल्या मतदाचा अधिकार बजावला आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी 5 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल आणि संध्याकाळीच मतमोजणी होईल.

शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याने तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड विधान परिषद निवडणुकीसाठी विधान भवनात दाखल झाले आहेत. पण त्यांना काँग्रेसच्या आक्षेपानंतर मतदान करू दिलेले नाही.

काँग्रेस पक्षाने गणपत गायकवाड यांच्या मतदानावर आक्षेप घेतला असून त्यामुळे गायकवाड यांना मतदान करू दिले नाही. यासंदर्भात मुख्य निवडणूक आयोगासोबत बोलणी सुरु असल्याची माहिती आहे. दुसरीकडे गणपत गायकवाड मतदान केंद्रच्या बाहेर उभे आहेत.

Ganpat Gaikwad News
Arvind Kejriwal Bail : केजरीवालांना अंतरिम जामीन! पाच दिवसांनी मिळू शकते कायमची बेल; कोर्टाचा निर्णय जाणून घ्या

काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग कामाला लागलं असून आयोगाकडून नियमांचा आढावा घेण्यात काम सुरू आहे. निवडणूक अधिकाऱ्याने यावर राज्य निवडणूक आयोगाकडून रिप्लाय मागवला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट केल्यानंतरच गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, आज होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि एआयएमआयएमचे एकूण 3 आमदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या आमदारांनी मविआला मतदान केल्यास त्यांच्या विजयाची शक्यता वाढणार आहे. तसेच याशिवाय बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आणि इतर असे एकूण ६ आमदार आहेत. त्यांच्या भूमिकेचा परिणाम निकालावर दिसून येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com