Sharad Pawar: शरद पवार गटातील 8 आमदारांना विधीमंडळाची नोटीस; काय आहे प्रकरण जाणून घ्या

अजित पवारांच्या गटाकडून यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती.
Sharad Pawar
Sharad Pawar
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या शरद पवार गट आणि अजितदादा गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. खरा पक्ष कोणाचा? यावरुन त्यांच्यात आता कायदेशीर लढाई देखील सुरु झाली आहे.

यापार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या ८ आमदारांना विधीमंडळानं नोटीस पाठवली आहे. तसेच या आमदारांना ८ दिवसांत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत. (Legislature notice to 8 MLAs from Sharad Pawar group over Ajit Pawar plea)

Sharad Pawar
Uddhav Thackeray: ठाकरेंनी घेतली पवारांची बाजू! शेतकऱ्यांसाठी काय केलं? विचारणाऱ्या मोदींनाच केला प्रतिप्रश्न

अजित पवार गटाची याचिका

पक्षविरोधी कृती केल्यामुळं आपल्याला अपात्र का करू नये? अशी याचिका अजित पवार गटानं विधीमंडळात दाखल केली होती. याबाबत म्हणणं मांडण्यासाठी विधीमंडळानं शरद पवार गटातील आमदाराना नोटीस पाठवली आहे. या आमदारांना समोरच्या गटानं केलेल्या आरोपांवर आपलं म्हणणं मांडण्यासाठी ८ दिवसांची वेळ देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Sawai Gandharv Mahotsav: 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तारीख जाहीर; कधी अन् कुठे होणार?

'या' आमदारांना नोटीस नाही

दरम्यान, शरद पवार गटाकडून लवकरच यावर उत्तर दाखल करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत शरद पवार गटातील 10 आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

पण अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना मात्र अद्याप नोटीस मिळालेली नाही. तसेच नवाब मलिक यांनी तटस्थ राहणं पसंद केल्यानं त्यांनादेखील नोटीस पाठवण्यात आलेली नाही.

Sharad Pawar
Ved, Sanskrit in Madarsha: मदरशांमध्ये वेद अन् संस्कृत शिकवणार! उत्तराखंडच्या मदरशा बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय

नोटीस पाठवलेले आमदार कोण?

अजितदादा गटाच्या याचिकेनुसार, अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील आणि संदीप क्षिरसागर या आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.