अबब..! सोलापूर जिल्ह्यात 44 दिवसांत 163 कोटींची दारु विक्री; तुमच्या गावात अवैधरित्या दारू विकत असल्यास ‘या’ क्रमांकावर द्या माहिती

जिल्ह्यात १ मार्च ते १३ एप्रिल या काळात तब्बल १६२ कोटींची मद्यविक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजेच १६ मार्च ते १३ एप्रिल या २८ दिवसात १५ लाख लिटर देशी-विदेशी दारू तर साडेसहा लाख लिटर बिअरचा खप झाला आहे.
solapur
Illegal sale of liquoresakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यात १ मार्च ते १३ एप्रिल या काळात तब्बल १६२ कोटींची मद्यविक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजेच १६ मार्च ते १३ एप्रिल या २८ दिवसात १५ लाख लिटर देशी-विदेशी दारू तर साडेसहा लाख लिटर बिअरचा खप झाल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे झाली आहे.

निवडणूक म्हटले की पैसा, दारूची चर्चा असते. या अनुषंगाने ग्रामीण व शहरातील पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क असून नाकाबंदीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. १६ मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्यापासून ५० हजारांहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात मागील दोन-अडीच वर्षांत मद्यविक्रीने विक्रम केल्याची स्थिती आहे.

दरम्यान, जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री, साठा, बनावट दारू, परराज्यातील दारूची अवैधरीत्या वाहतूक होत असल्यास याबाबत नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील १ मार्चपासूनची मद्यविक्री

  • मद्य लिटरमध्ये विक्री अंदाजे किंमत

  • देशी मद्य ११,३६,२३५ ४५.४५ कोटी

  • विदेशी मद्य ११,१५,२७० ८२.५३ कोटी

  • बिअर ९,७६,८१४ ३४.१९ कोटी

  • वाईन १०,६४१ ८८ लाख

  • एकूण ३२,३८,९६० १६३.९७ कोटी

विनापरवाना मद्यपान येईल अंगलट

परवान्याशिवाय मद्यविक्री, मद्यपान गुन्हा आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने ढाबे, हॉटेलवर आमच्या पथकांचे लक्ष आहे. मद्यपान करणाऱ्यांकडे परवाना बंधनकारक आहे, अन्यथा त्या मद्यपींवर गुन्हा दाखल होऊन न्यायालयाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होवू शकते. आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाभर अवैधरीत्या होणाऱ्या दारू वाहतुकीवर व निर्मितीवर विशेषत: हातभट्टीच्या ठिकाणांवर आणि परराज्यातून येणाऱ्या दारूवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

- नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर

ग्रामपंचायतीचा दारूबंदीचा ठराव, तरी दारूविक्री सुरुच

जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर काही दिवसांत कारवाई झालेली नाही. त्यामुळे अनेक गावांमध्ये बिनधास्तपणे हातभट्टी विक्री होत असल्याची स्थिती आहे. सावळेश्वर (ता. मोहोळ) या गावात दारुबंदीचा ठराव होऊन अनेक वर्षे झाली, तरीपण हातभट्टी विक्री थांबलेली नाही, हे विशेष. ग्रामस्थांनी अनेकदा पोलिस ठाण्यास निवेदने दिली, पण कारवाईत सातत्य नसल्याने या गावात दारूविक्री सुरुच आहे. अशी स्थिती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये असून तरुण दारूच्या आहारी जात असल्याची चिंता पालकांना सतावू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.