Lok Sabha Result Maharashtra: काँग्रेसचा सिक्सर अन् भाजप हिट विकेट; वाचा, लोकसभा निवडणुकीत कशी होती महाराष्ट्रातील पक्षांची कामगिरी

INDIA vs NDA: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांमध्ये जी राजकीय उलथापालथ झाली ती जनतेला रुचली नसल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून स्पष्ट झाले आहे. या पक्षफुटीचा फटका जे पक्ष फुटले त्यापेक्षा भाजपलाच जास्त बसल्याचे दिसत आहे
Uddhav Thackeray| Sharad Pawar| Devendra Fadnavis|Nana Patole| Ekneth Shinde|Ajit Pawar
Uddhav Thackeray| Sharad Pawar| Devendra Fadnavis|Nana Patole| Ekneth Shinde|Ajit PawarEsakal
Updated on

गेले दोन तीन महिने देशभरातील जनतेसाठी मोठी करमणुकीची ठरली आहेत. मार्च महिन्यात आधी आयपीएल सुरू झाली. त्यानंतर लोकसभेचा धुरळा उठला पुढे टी-20 क्रिकेट विश्वचषक सुरू झाला आणि आता लोकसभेच्या निकालानंतर देशात कोणाचे सरकार येणार यावरून देशभरतील जनतेची उत्सुकता ताणली गेली आहे.

काल जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या आघाडीला काठावरचे बहुमत दिले आहे. यामध्ये भाजप 240 जागांवर तर एनडीएला 293 जागा मिळाल्या.

दुसरीकडे काँग्रेसने तब्बल दहा वर्षांनंतर दमदार कामगिरी करत 99 जागांवर विजय मिळवला आहे. तर इंडिया आघाडीला 234 जागांवर विजय मिळाला आहे.

महाराष्ट्रात रंगतदार सामना

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचारामध्ये भाजप व महायुतीसाठी पंतप्रधान मोदींनीच बॅटींग केली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छोट्या मोठ्या खेळी खेळल्या. मात्र, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र आऊट ऑफ फॉर्म दिसले.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सलामीवीर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक बॅटींग करत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना चांगलेच धुतल्याचे पाहायला मिळाले. तर शरद पवार यांनी आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवत आपल्या पक्ष्यासह महाविकास आघाडीसाठी लोकसभेचा सामना आणखी सोपा केला.

या लोकसभेच्या सामन्यात संघात कोणतेही स्टार खेळाडू नसतानाही काँग्रेसने राज्यात सर्वाधिक 13 जागा जिंकत महाराष्ट्रातील लोकसभेचे विजेतेपदच मिळवले असे म्हणाता येईल.

Strike Rate OF BJP In Lok Sabha Election 2024 Maharashtra
Strike Rate OF BJP In Lok Sabha Election 2024 MaharashtraEsakal

महाराष्ट्र भाजपसाठी मोदींची बॅटींग व्यर्थ

राज्यात गेल्या दोन वर्षांत भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली. पण जशी जशी निवडणूक जवळ येत गेली तशी तशी भाजपला जाणीव होत गेली की, राज्यात महायुतीला महाविकास आघाडीकडून जोरदार टक्कर मिळणार आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येत महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांसाठी 23 ठिकाणी सभा घेतल्या. पण त्यांनी ज्या 23 उमेदवारांठी सभा घेतल्या त्यातील 18 उमेदवार पराभूत झाले आहेत.

या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 28 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये भाजपला अवघ्या 9 जागा जिंकता आल्या. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा स्ट्राइक रेट 32.14 इतकाच राहिला. त्यांना राज्यात सर्वाधिक 26.18 टक्के मते मिळाली.

Strike Rate OfNCP BJP In Lok Sabha Election 2024 Maharashtra
Strike Rate OfNCP BJP In Lok Sabha Election 2024 MaharashtraEsakal

टीम बदलली अन् दादा ऑउट ऑफ फॉर्म गेले

महाविकास आघाडीतील प्रमुख नेते म्हणून स्थान असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या जुलैमध्ये राष्ट्रवादीतील आमदार घेऊन महायुतीमध्ये पक्षासह प्रवेश केला. मात्र, शरद पवार यांनी राहिलेल्या थोड्याच आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह असा दमदार खेळ केला की, अजित पवार यांनी आपला फॉर्मच गमावला.

या सर्व घडामोडीत अजित पवारांना त्यांच्यासोबर गेलेल्या एकाही मत्त्वाच्या नेत्याची साथ लाभली नाही. त्यामुळे एकाकी लढत देणारे अजित पवार निवणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मैदानाबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.

या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रुपाने एकमेव विजय मिळवला. त्यामुळे 4 जागा लढवत एकच जागी जिंकणाऱ्या राष्ट्रावादीचा स्ट्राइक रेट 25 इतकाच राहिला. तर मतांची टक्केवारी 3.60 इतकी राहिली.

Strike Rate OF Shiv Sena In Lok Sabha Election 2024 Maharashtra
Strike Rate OF Shiv Sena In Lok Sabha Election 2024 MaharashtraEsakal

शिंदेंनी विरोधकांचा प्रत्येक चेंडू मैदानाबाहेर टोलावला

लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना फोडल्यामुळे फटका बसेल, तसेच त्यांचा एकही उमेदवार निवडूण येणार नाही अशी टीका त्यांच्यावर होत होती. पण मॅन मॅनेजमेन्टमध्ये हातखंडा असलेल्या शिंदे यांनी विरोधकांचा प्रत्येक चेंडू मैदानाबाहेर टोलावत सर्वांना आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली.

शिंदे यांच्या शिवसेनेने यंदा 15 जागा लढवल्या आणि त्यामध्ये 7 जागी निवडणूक जिंकली. यामध्ये त्यांच्या कामगिरीचा स्ट्राइक रेट 40 इतका राहिला. तर त्यांनी राज्यातून तब्बल 12.95 टक्के मते घेतली.

Strike Rate OF NCP SP In Lok Sabha Election 2024 Maharashtra
Strike Rate OF NCP SP In Lok Sabha Election 2024 MaharashtraEsakal

पवारांची संयमी खेळी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय शांततेने सर्व परिस्थिती हाताळली. जे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे राहिले त्यांना हाताशी धरत पवारांनी लोकसभा लढवली.

यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीत जागावाटपापासून संयम राखत सर्वात कमी जागा घेतल्या. 10 जागा मिळालेल्या पवारांनी या दहाही जागांवर सर्व समीकरणांमध्ये घट्ट बसणारे उमेदवार निवडले आणि तिथेच त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

निवडणुकीच्या प्रचारात पावारांच्या सभांची माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावर जास्त चर्चा झाली नाही. मात्र, त्यांनी जिथे सभा घेतल्या तिथल्या मतदारांना आपलेसे करण्यात यश मिळवले. लढवलेल्या 10 जगांपैकी 8 जागा जिंकत पवारांची संयमी खेळी नव्या राष्ट्रवादीला संजीवनी देणारी ठरणार आहे. या निवडणुकीतील पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट तब्बल 80 इतका होता. त्यांच्या पक्षाने 10.27 टक्के मते मिळाली.

Strike Rate OF Shiv Sena UBT In Lok Sabha Election 2024 Maharashtra
Strike Rate OF Shiv Sena UBT In Lok Sabha Election 2024 MaharashtraEsakal

ऑलराउंडर उद्धव ठाकरे

या निवडणुकीचा महाराष्ट्रातील निकाल पूर्णपणे लागला तेव्हा उद्धव ठाकरेच्या पक्षाचा जागा पाहूण 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील टीम इंडिया आठवली. कारण संपूर्ण विश्वचषकात दमदारी कामगिरी करणारा भारतीय संघ अंतिम सामन्यात मात्र पराभूत झाला होता.

तसेच काहीसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत झाले. कारण संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यभरात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने फ्रन्ट फूटवर खेळत जोरदार प्रचार केला होता. यासह ठाकरे यांनी आपल्या मित्र पक्षांसाठीही सभा घेतल्या होत्या. त्यामुळे त्याच्या विजयात ठाकरेंचाही वाट आहे असे म्हणावे लागेल.

यामध्ये ठाकरेंच्या बरोबर संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यासारख्या धडाकेबाज वक्त्यांनी सभा गाजवल्या होत्या. त्यामुळे शिवसेना सर्वाधिक जागा जिंकेल असा अंदाज होता. मात्र 21 जागा लढवणाऱ्या शिवसेनेला अवघ्या 9 जागांवर यश मिळाले. त्यामुळे निवडणुकीत त्यांचा स्ट्राइक रेट 42.85 इतका राहिला. तर मतांची टक्केवारी 16.72 इतकी आहे.

Uddhav Thackeray| Sharad Pawar| Devendra Fadnavis|Nana Patole| Ekneth Shinde|Ajit Pawar
INDIA vs NDA: मोदींना सत्तेतून खेचणार? ही तर लोकांची ईच्छा, योग्य वेळी पाऊले उचलणार; सत्तास्थापनेबाबत खर्गे स्पष्टच बोलले
Strike Rate OF Congress In Lok Sabha Election 2024 Maharashtra
Strike Rate OF Congress In Lok Sabha Election 2024 MaharashtraEsakal

अंडरडॉग काँग्रेसने राज्यात मारले लोकसभेचे मैदान

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसची कामगिरी लाजीरवाणी होती असेच म्हणावे लागेल. कारण 2014 मध्ये त्यांच्या वाट्याला 2 तर 2019 एकच जागा आली होती. त्यामुळे यंदाही काँग्रेस राज्यात काही खास कामगिरी करेल असे कोणालाही अपेक्षित नव्हेत.

पण, उमेदवारांची योग्य निवड, प्रत्येक नेत्याला दिलेली जबाबदारी आणि पद्धतशीरपणे केलेल्या प्रचाराबरोबर ठाकरे आणि पवारांच्या पक्षाची साथ यामुळे अंडरडॉग म्हणून लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या काँग्रेसने राज्यात सर्वाधिक 13 जागा जिंकत मैदान मारले.

Uddhav Thackeray| Sharad Pawar| Devendra Fadnavis|Nana Patole| Ekneth Shinde|Ajit Pawar
BJP vs Shiv Sena: महायुतीत फाटणार? सर्व्हेच्या नावावर आमच्या जागा कापल्या, शिवसेना आमदाराचा रोख कुणाकडे

विशाल पाटील ठरले इमर्जिंग प्लेअर

ज्यांच्या घरातून एकेकाळी काँग्रेसच्या उमेदवारांचे तिकिट वाटप ज्यांच्या घरातून व्हायचे त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना सांगलीतून तिकिट मिळवण्यासाठी महिनाभर संघर्ष करावा लागला. पण ठाकरे शिवसेनेच्या हट्ट्पापुढे नमते घेत काँग्रेसने ही जागा त्यांना सोडली अन् विशाल पाटील यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना वैतागलेले त्यांचे विरोधक, पक्षांतर्गत विरोध आणि जेनतेनेही विशाल यांच्या भूमिकेचे स्वागत करत ही निवडणूक हातात घेतली. अन् विशाल पाटील तब्बल सव्वा लाख मतांनी विजयी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.