मुंबई : रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपनं रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. पण त्यांचे सासरे एकनाथ खडसे आणि ननंद रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळं या जागेवर राष्ट्रवादीकडून या दोघांपैकी एकाला कोणाला तरी उमेदवारी दिली जाऊ शकते.
त्यामुळं रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे असा सामना रंगणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. याबाबत स्वतः एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे. (lok sabha election 2024 will there be khadse vs khadse match in raver eknath khadse clearly said about it)
एकनाथ खडसे म्हणाले, "रावेरची जागा ही महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीकडं आहे. मी इथून लोकसभा निवडणूक लढवू इच्छित नाही. कारण माझी तब्येत ठीक नाही डॉक्टरांनी मला मनाई केली आहे. त्याचबरोबर रोहिणी खडसे देखील इच्छुक नाहीत. कारण त्यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे की त्या मुक्ताईनगर इथून विधानसभा निवडणूक लढवू इच्छित आहेत.
पण इथून ७ ते ८ जण इच्छुक आहेत. शरद पवारांसोबत याप्रकरणी आज बैठक झाली, यामध्ये प्रत्येक उमेदवाराची माहिती घेण्यात आली. यांपैकी काही उमेदवारांची छाननी झाली असून त्यातून आता प्रत्यक्ष उमेदवाराची घोषणा उद्या होईल" (Latest Marathi News)
खडसे-खडसे विरुद्ध संघर्ष व्हावा यासाठी भाजपनं रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे का? या चर्चांवर बोलताना खडसे म्हणाले, "अशा चर्चा आता अनेक होतील. रावेरचा उमेदवार उद्या घोषित झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सामना अतिशय चुरशीचा होईल" एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपत दाखल होतील असं विधान भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना त्यांना मी उत्तर देऊ इच्छित नाही, असंही यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीकडून ४८ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. यांपैकी ४ ते ६ जागांबाबत थोडी चर्चा सुरु होती, पण त्यावर आज निर्णय होऊन जाईल, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तसेच सध्याच्या काही सर्व्हेंमध्ये महायुतीला कमी तर काहींमध्ये जास्त जागा असं दाखवलं जात आहे. त्यामुळं या सर्व्हेंचा विचार करता अंतिम टप्प्यातील सर्व्हेंमध्ये काहीतरी तथ्ये असतात आत्ता आलेल्या सर्वेंचं काही खरं नाही, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.