लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज राज्यातील 11 लोकसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. चौथ्या टप्प्यात राज्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे. दरम्यान सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेस सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच EVM मशिनमध्ये बिघाड झाल्याचं दिसून आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर, परळी आणि पुण्यात EVM मशिनमध्ये बिघाड झाल्याचं दिसून आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याचं समोर आलं आहे. सुमारे 25 ठिकाणी यामुळे मतदान प्रक्रिया रखडली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी नव्या ईव्हीएम मशीन लावून मतदानाला सुरुवात झाली आहे. तर बीडच्या परळी भागातील मतदान केंद्रावरही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सकाळच्या सात वाजता मतदानासाठी आलेल्या मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. परळीमध्ये मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
पुण्यातील वडगाव शेरी भागात असलेले मतदान केंद्रावर नागरिक खोळंबले आहेत. मतदान करण्यासाठी आलेले नागरिक गेल्या अर्धा तासांपासून रांगेत उभे आहेत. पुणे इंटरनॅशनल स्कूल या मतदान केंद्रावरील ईव्हीएम चालत नसल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली आहे. नवीन ईव्हीएम आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तर दुसरीकडे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील गणेश मोफत वाचनालय मतदान केंद्रावरील EVM मशीन देखील काही काळ बंद पडलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.