Lok Sabha Election: ‘वंचित’ला सोबत घेण्याचे ‘मविआ’चे कोडे सुटेना! जागावाटपाचा पेच सुटणार की ‘वंचित’लाच सोडावे लागणार?

Lok Sabha Election: अनुसूचित जातीचे मतदारसंघ ही काँग्रेससाठी हक्काची असणारी व्होट बँक काँग्रेसच्या हातातून पूर्णपणे निसटली असल्याचे २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट होत आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionEsakal
Updated on

Lok Sabha Election: अनुसूचित जातीचे मतदारसंघ ही काँग्रेससाठी हक्काची असणारी व्होट बँक काँग्रेसच्या हातातून पूर्णपणे निसटली असल्याचे २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसारखा दलित मतांवर प्रभाव टाकू शकणारा पक्ष सोबत असावा, असे महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांना वाटत आहे. या गरजेतूनच ‘वंचित’चा समावेश महाविकास आघाडीत व्हावा, असे वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र जागावाटपावर आघाडी पोहोचू शकलेली नाही.

‘वंचित’ला सोबत नसेल तर ‘वंचित’च्या उपद्रव मूल्याचा फटका यापूर्वी विशेषतः काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खाल्ला आहे. त्यामुळे ‘वंचित’ला सोबत ठेवण्यास काँग्रेस विशेष करून आग्रही आहे. मात्र येत्या दोन दिवसांतच वंचित आघाडीमध्ये असेल की नाही हे स्पष्ट होणार असून निवडणुकीचे काही जागांवरील चित्रही स्पष्ट होणार आहे.

Lok Sabha Election
Amravati Lok Sabha 2024: अमरावतीत 'कांटे की टक्कर'! नवनीत राणा की आनंदराव अडसूळ कोणाच्या पारड्यात पडणार उमेदवारी

शिवसेनेसोबत वर्षभरापूर्वीच ‘वंचित’ची आघाडी झाली होती. शिवशक्ती-भीमशक्तीच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. मात्र युती झाल्यानंतर देखील शिवसेनेने त्यांचा हात सोडून महाविकास आघाडीसोबत घरोबा केला तेव्हा आम्हास विश्वासात घेतले नाही, अशी ‘वंचित’ची खंत आहे. याबाबत प्रकाश आंबेडकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडूनही केला गेला नाही. उलट महाविकास आघाडीच्या बैठकांपासून ‘वंचित’ला दूर ठेवले गेले, अशी भावना त्यांच्यात बळावत गेली.

Lok Sabha Election
Hatkanangale Lok Sabha 2024: हातकणंगल्यात राजू शेट्टींमुळे येणार रंगत; शेट्टींच्या होमपीचवर सर्वच पक्ष सावध

मात्र ‘वंचित’ला जागा वाटपाच्या चर्चेतून दूर ठेवण्यामागे देखील २०१९ च्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे, हे देखील विसरुन चालणार नाही. त्या निवडणुकीत ‘वंचित’ आणि एमआयएमचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या निशाण्यावर भाजपपेक्षाही काँग्रेस होती. ‘वंचित’ची तेव्हाची भूमिका भाजपला बळ देणारी असल्याचे उघडपणे बोलले जात होते. स्वत: आंबेडकर यांनी अकोला आणि सोलापूर या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या दोन्ही जागांवरील काँग्रेसचे उमेदवार पडले याचे खापर अजूनही काँग्रेस आंबेडकरांवरच फोडते.

Lok Sabha Election
Latur Lok Sabha 2024: भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत; काँग्रेसकडून नव्या चेहऱ्याला संधी

‘वंचित’चेही भवितव्य ठरणार

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील राखीव मतदारसंघ असलेल्या अमरावती, रामटेक, सोलापूर, लातूर आणि शिर्डी यांपैकी एक ही मतदारसंघ काँग्रेसने जिंकलेला नाही. अमरावती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला होता; पण ‘राष्ट्रवादी’ने अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. अनुसूचित जातीचे मतदारसंघ ही काँग्रेससाठी हक्काची असणारी व्होट बँक काँग्रेसच्या हातातून पूर्णपणे निसटली असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीवरूनही स्पष्ट होते. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत वंचितचे उपद्रवमूल्य जे दिसून आले, ते यापुढच्या काळातही प्रभाव पाडेल का? या प्रश्नावर ‘वंचित’चे भवितव्य ठरणार आहे.

Lok Sabha Election
Sangli Lok Sabha 2024: भाजपच्या बालेकिल्ल्यात स्वाभिमानी पक्ष लावणार सुरुंग? भाजप, काँग्रेस भिडल्यास तुल्यबळ लढत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.