Maharashtra Politics : ठाकरे गटाचा लोकसभेच्या २३ जागांवर दावा, तर काँग्रेसकडून २२ वर तयारी सुरू; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काय?

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यादरम्यान राज्यातील इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावर रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
lok sabha election seat sharing shiv sena 23 congress starts preparations on 22 seats Sharad Pawar NCP
lok sabha election seat sharing shiv sena 23 congress starts preparations on 22 seats Sharad Pawar NCP
Updated on

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यादरम्यान राज्यातील इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावर रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वी २३ जागांवर दावा सांगण्यात आला आहे. यादरम्यान महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही खासदार नाहीये,मात्र पक्षाकडून जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यातली प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या एका बैठकीत ४८ लोकसभा जागांपैकी २२ वर उमेदवार देण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

शुक्रवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत राज्यातील काँग्रेस नेते आणि खर्गे यांच्यात सध्याच्या परिस्थितीवर चर्चा आली आणि पक्षाचा भक्कम पकड असलेल्या जागांबद्दल चा रिपोर्ट देखील सादर करण्यात आला. दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही नेत्यांनी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ३० जागांवर निवडणूक लढवली पाहिजे असे सुचवले आहे, तसेच पक्षाच्या काही बड्या नेत्यांनी जेथे विजय मिळवण्याच्या शक्यता आहेत अशा कमीत कमी २२ जागांवर पक्षाने निवडणूक लढवली पाहिजे, असा प्रस्ताव समोर ठेवला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात जागा वाटपावरून चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर ही महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे दोन बडे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात‌ बैठक झाल्याची सुत्रांची माहिती आहे.

lok sabha election seat sharing shiv sena 23 congress starts preparations on 22 seats Sharad Pawar NCP
Maharashtra Politics : राऊतांच्या 23 जागेच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी अलर्ट! मातोश्रीवरील चर्चेनंतर 'या' जागा लढवणार?

दरम्यान सांगितले जात आहे की, काँग्रेस नेत्यांनी खर्गे यांनी माहिती दिली आङे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फूटीनंतर त्यांच्या सहकारी पक्षांकडे त्यांचा निवडणूक चिन्हवर देखील ताबा नाहीये. फक्त काँग्रेसच असा पक्ष आहे ज्याच्याकडे निवडणूक चिन्ह आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खर्गे आणि राज्यातील नेते प्रत्येक मतदारसंघाच्या स्थितीनुसार सहकारी पक्षांसोबत जागा वाटपाच्या शक्यतांवर विचार करत आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गाटाचे नेते संजय राऊत यांनी सार्वजनिकरित्या लोकसभा निवडणूकीत जागावाटपामध्ये २३ जागांची मागणी केल्यामुळे देखील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यादरम्यान खर्गे यांनी राज्यातील नेत्यांना आघाडीच्या जागावाटपाबद्दल कोणतेही विधान न करण्याचा सल्ला दिला आहे. जागावाटपाच्या फॉर्मूल्यावर निर्णय घेण्यासाठी काँग्रेस हायकमांड आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांची बैठक होणार आहे.

lok sabha election seat sharing shiv sena 23 congress starts preparations on 22 seats Sharad Pawar NCP
PM मोदी फॅक्टर! पंतप्रधान चहा पिऊन गेले अन् कलेक्टरने घरी जाऊन दिलं आयुष्मान कार्ड

२०१९ मध्ये काय झालं होतं?

२०१९ साली झालेल्या निवडणूकीत काँग्रेसने २५ जागांवर निवडणूक लढवली होती, मात्र पक्षाला फक्त एकच जागेवर विजय मिळाला होता. तर राष्ट्रवादीने १९ जागा लढवल्या होत्या आणि चार जागांवर विजय मिळवला. शिवसेना-भाजपसोबत युतीमध्ये होती, तेव्हा शिवसेनेने २३ जागांवर निवडणूक लढवत १८ जागांवर विजय मिळवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()