Lok Sabha Elections 2024: इंडिया आघाडीतील मोठे नेते जेलमधून बाहेर आले, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालूप्रसाद यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदी यांनी आज नगरमध्ये सुजय विखे आणि शिर्डी लोकसभा उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.
मुस्लिमांना 'संपूर्ण' आरक्षण मिळालेच पाहिजे या राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या वक्तव्याने राजकीय वादळ निर्माण झाले. टीकेवर प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, चारा घोटाळ्यात जामीनावर असलेले नेते आहेत. जे तुरुंगात होते आणि चारा घोटाळ्यात दोषी ठरले. ते म्हणतात मुस्लिमांना आरक्षण मिळायला हवं, फक्त आरक्षण नाही, ते म्हणतात की मुस्लिमांना ‘संपूर्ण’ आरक्षण मिळायला हवं, याचा अर्थ काय? यांना एसटी, एसी, ओबीसी सर्व गरीबांचे आरक्षण मुस्मिम समाजाला द्यायचे आहे.
जोपर्यंत मी जिवंत आहेत, तोपर्यंत धर्मनिरपेक्ष भारताची ओळख मिटवू देणार नाही, अशी शपथ मोदींनी घेतली. काँग्रेसने अनेक वर्ष देशातील नागरीकांचा विश्वासघात केला. इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशाच्या हिताचे मुद्दे नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
२६\११ बाबात काँग्रेस नेत्यांचे विधान धक्कादायक आहे. काँग्रेसची हतबलता समोर आली आहे. जवान कुणामुळे शहीद झाले हे संपूर्ण देशाला माहित आहे. काँग्रेसचे नेते कसाबची बाजू घेत आहेत. मुंबईतील हल्ल्यात शहीद झालेल्यांचा हा मोठा अपमान आहे. काँग्रेसला देशातील प्रत्येक वर्गाने नाकारले असल्याचे मोदी म्हणाले.
त्यांचे नेते, जे तुरुंगात आहेत आणि चारा घोटाळ्यात दोषी ठरले आहेत.” कोर्ट… तो नुकताच जामिनावर बाहेर आला आहे… तो म्हणाला की मुस्लिमांना आरक्षण मिळायला हवं, फक्त आरक्षण नाही, ते म्हणतात की मुस्लिमांना ‘संपूर्ण’ आरक्षण मिळायला हवं, याचा अर्थ काय?
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.