संग्रामपूर: देशाचे केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव हे लोकसभा प्रवास या भाजपाच्या रणनितीनुसार तिसऱ्यांदा बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर दोन दिवसांकरिता आलेले होते. पहिल्या दिवशी घाटावरील तीन विधानसभा मतदार संघात विविध कार्यक्रम घेत ते आज घाटाखालील विधानसभा क्षेत्रात प्रवास करीत होते.
यावेळी त्यांनी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात शेगाव येथे लाभार्थी संमेलन, वरवट बकाल येथे संयुक्त मोर्चा संमेलन तर नीमखेडी जळगाव जामोद येथे विकास तीर्थ या कार्यक्रमात सहभाग घेतला. मोदी सरकारने नऊ वर्षात केलेल्या कामांचा लेखा जोखा जनतेसमोर ठेवणे हे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट होते.
आज केंद्रीय मंत्री भुपेंद यादव यांनी प्रथम शेगाव येथील पांडुरंग कृपा मंगल कार्यालयात आयोजित लाभार्थी संमेलनात केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थींना विविध धनादेशाचे वितरण केले. तसेच विविध योजनांची माहिती देखील देण्यात आली.
त्यानंतर सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा, अनु जाती व जमाती मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, ओबीसी मोर्चा अशा सातही मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला ६०० पेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व भाजपा कार्यकर्त्यानी विशेष प्रयत्न करून सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.
त्यानंतर केंद्र सरकारचा ५० टक्के हिस्सा असलेल्या आदिवासी बहुल परिसरातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी नीमखेडी येथे जाऊन पाहणी केली व तेथील जमलेल्या आदिवासी बांधवासोबत चर्चा केली.
यावेळी तेथील स्थानिक रहिवासी डकारसिंग, गाड्या मामा, हिरालाल, सुखलाल आदींनी शाल व हार घालून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व राज्यसभा सदस्य कल्पना सैनी यांचा सत्कार केला.
या संपूर्ण दौऱ्यात माजी मंत्री आमदार डॉ.संजय कुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.आकाश फुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, माजी आमदार विजयराज शिंदे, प्रभारी कल्पना बुंधे इतर अनेक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.