Maharashtra Politics : राऊतांच्या 23 जागेच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी अलर्ट! मातोश्रीवरील चर्चेनंतर 'या' जागा लढवणार?

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील महाविकास आघाडी मधील घटक पक्षांमध्ये देखील जागावाटपाच्या मुद्द्यावर रस्सीखेच सुरू आहे
Lok Sabha elections seat sharing NCP sharad pawar faction Shivsena UBT maharashtra politics
Lok Sabha elections seat sharing NCP sharad pawar faction Shivsena UBT maharashtra politics
Updated on

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान राज्यातील महाविकास आघाडी मधील घटक पक्षांमध्ये देखील जागावाटपाच्या मुद्द्यावर रस्सीखेच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लोकसभेच्या २३ जागांवर दावा सांगितल्यानंतर काँग्रेसवर दबाव वाढला आहे.

यादरम्यान राज्यातील काँग्रेस नेत्यांची काल दिल्लीत‌ ‌बैठक झाल्यानंतर आज जागा वाटपाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट‌ आणि ठाकरे गटाची बैठक काल झाली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर ही महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे दोन बडे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात‌ बैठक झाल्याची सुत्रांची माहिती आहे.

Lok Sabha elections seat sharing NCP sharad pawar faction Shivsena UBT maharashtra politics
Mangaon Accident : ताम्हिणी घाट परिसरात खासगी ट्रॅव्हल्स बस उलटली! दोघांचा मृत्यू, 55 जण जखमी

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 23 जागांबाबत भूमिका मांडल्यानंतर राष्ट्रवादीनेदेखील आपल्या जागांबाबतची भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली असल्याची माहिती मिळत आहे. मातोश्रीवर या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत दोन तास चर्चा पार पडली. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील कुठल्या जागा लढवणार याबद्दल चर्चा झाली.

Lok Sabha elections seat sharing NCP sharad pawar faction Shivsena UBT maharashtra politics
Lakhbir Singh Landa : कॅनडातील खलिस्तानवाद्यांविरोधात भारत आक्रमक! बब्बर खालसाचा लखबीर सिंग लांडा दहशतवादी घोषित

राष्ट्रवादी या जागा लढवणार?

शिरूर, सातारा, माढा, बारामती, जळगाव, रावेर, दिंडोरी, बीड, भिवंडी, अहमदनगर या जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. तसेच अमरावती, भंडारा या जागांसाठी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()