Rahul Gandhi Video: दलितांच्या घरात काय बनतं? राहुल गांधींनी जाणून घेतली खाद्यसंस्कृती, कोल्हापुरात स्वतः बनवलं जेवण

Congress Leader Rahul Gandhi: ''दलित काय खातात? काय शिजवतात? त्याचं सामाजिक आणि राजकीय महत्त्व काय आहे, या जिज्ञासेपोटी मी अजय तुकाराम सनदे आणि अंजना सनदे यांच्या कोल्हापूर येथील घरी स्वयंपाक बनवण्यासाठी हातभार लावला.''
Rahul Gandhi Video: दलितांच्या घरात काय बनतं? राहुल गांधींनी जाणून घेतली खाद्यसंस्कृती, कोल्हापुरात स्वतः बनवलं जेवण
Updated on

Rahul Gandhi Maharashtra Tour: खेडेगावांमध्ये आजही दलितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. सवर्णांच्या स्वयंपाकघरात काय बनतं हे सगळ्यांना माहिती असतं. पण दलितांच्या घरात काय बनतं हे कुणाला माहिती नसतं. त्यामुळेच राहुल गांधींनी कोल्हापुरात थेट दलिताच्या घरात जाऊन स्वयंपाक केला आणि जेवणाचा आस्वाद घेतला. मराठवाड्याच्या खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक शाहू पाटोळे यांनी राहुल यांना दलितांच्या खाद्यसंस्कृतीची माहिती दिली.

राहुल गांधींनी स्वयंपाकाचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. व्हिडीओबद्दल माहिती देताना गांधी म्हणाले की, दलितांच्या स्वयंपाकाबद्दल कुणालाही माहिती नसतं. शाहू पाटोळे म्हणतात, दलित काय खातात, हे कुणालाच माहिती नसतं.

दलित काय खातात? काय शिजवतात? त्याचं सामाजिक आणि राजकीय महत्त्व काय आहे, या जिज्ञासेपोटी मी अजय तुकाराम सनदे आणि अंजना सनदे यांच्या कोल्हापूर येथील घरी स्वयंपाक बनवण्यासाठी मदत केली. यावेळी मराठवाड्याच्या खाद्यसंस्कृतीचे अभ्यास शाहू पोटोळे यांची उपस्थिती होती, असं राहुल गांधी सांगतात.

Rahul Gandhi Video: दलितांच्या घरात काय बनतं? राहुल गांधींनी जाणून घेतली खाद्यसंस्कृती, कोल्हापुरात स्वतः बनवलं जेवण
Politics: ...आमच्यासाठी हे मोठे यश; अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

यावेळी पाटोळे आणि सनदे यांनी जातीभेदांचे अनुभव शेअर करत दलित खानपानाविषयी जागरुकता आणि संस्कृतीचं डॉक्युमेंटेशन यावर चर्चा केली. बहुजनांना अधिकार आणि हक्काचा वाटा संविधानाने दिलेला आहे, त्याच संविधानचं रक्षण आम्ही करणार, अशा भावना गांधींनी व्यक्त केल्या.

दरम्यान, राहुल गांधींनी सनदे यांच्या घरी हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी मदत केली आणि जेवणाचा आस्वाद घेतला. याचा व्हिडीओ स्वतः राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

नेमकं काय घडलं?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. सकाळी दहाच्या दरम्यान त्यांचं विमानतळावर आगमन झालं.

यावेळी त्यांनी कार्यक्रमस्थळी न जाता थेट कोल्हापुरातल्या उचगाव इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राहणाऱ्या टेम्पोचालक अजित तुकाराम सनदे यांच्या घरी भेट दिली.

कारमधून उतरलेले राहुल गांधी थेट सनदे यांच्या घरात जाऊन संवाद साधू लागले. त्यांनी स्वत: स्वयंपाक घराचा ताबा घेऊन सनदे कुटुंबाशी गप्पा मारत वांगी, हरभरा आणि कांद्याची भाजी तयार केली. अंजना सनदे यांनी भाकरी केल्या.

त्यानंतर सनदे कुटुंब आणि गांधींनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला. राहुल गांधींच्या अनपेक्षित भेटीने आम्ही भारावून गेलो. त्यांनी स्वत: भाज्या तयार करून आमच्यासोबत जेवणाचा आनंद घेतला. आम्हाला त्यांच्या हातच्या भाज्या खाण्याची संधी मिळाली. हा क्षण आमच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय असल्याची भावना अजित सनदे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.