Maharashtra Politics : लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र? भाजपच्या निवडीने संकेत, राजकीय हालचालींना वेग

भाजपने लोकसभा निवडणूक प्रमुख निवडताना सावध आणि हुशारीने चाल खेळली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsesakal
Updated on
Summary

भाजप बाराही महिने निवडणूक मोडवर असल्याने सातत्याने तयारीत राहणे, ही त्यांची पद्धत आहे.

सांगली : भाजपने लोकसभा (LokSabha Election) आणि विधानसभा मतदार संघांचे निवडणूक (Assembly Election) प्रमुख जाहीर केले आहेत. कालावधीनुसार लोकसभा निवडणूक पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये, तर विधानसभा निवडणूक पुढील वर्षाखेरीस अपेक्षित आहे.

परंतु, भाजपने (BJP) दोन्ही निवडणुकांसाठी एकाचवेळी प्रमुख जाहीर करत या दोन्ही निवडणुका एकावेळी होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता सर्वपक्षीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांचे पारडे कोणत्या बाजूला झुकेल, याबाबत साशंकता आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाली तर राज्यात फायदा होऊ शकतो, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने एक प्रस्तावदेखील चर्चात आहे. त्यामुळेच या निवडी एकत्र झाल्या असाव्यात, अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटप, मतदारसंघनिहाय आढावा, इच्छुकांशी चर्चा, सर्वेक्षण आदी घडामोडींत सगळ्याच पक्षांनी आघाडी घेतली आहे.

Maharashtra Politics
Kolhapur Riots : 'चिंता, फूटपाड्या उद्योगांना साथ मिळण्याची'; वाचा 'कोल्हापूर दंगली'वर परखड भाष्य करणारा लेख

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानीने अंदाज घ्यायला सुरवात केली आहे. भाजप बाराही महिने निवडणूक मोडवर असल्याने सातत्याने तयारीत राहणे, ही त्यांची पद्धत आहे. काँग्रेसने मुंबईत नुकताच सर्व जागांचा आढावा घेत इच्छुकांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. त्यात चुकूनही विधानसभेवर चर्चा होणार नाही, याची काळजी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघनिहाय आढावा घेत उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचना देत आहे.

Maharashtra Politics
Karnataka : महिलांसाठी आनंदाची बातमी! मोफत बसप्रवासास आजपासून प्रारंभ, कितीही वेळा करता येणार प्रवास

सर्वच पक्षांकडून लोकसभा केंद्रस्थानी ठेवून हालचाली सुरू आहेत. अशावेळी भाजपच्या पक्षांतर्गत निवडींनी त्याला नवी दिशा दिली आहे. भाजप आणि काँग्रेस अशा सरळ लढतीची इथे अपेक्षा असली तरी राष्ट्रवादीने जागेवर दावा केला आहे. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्याचा काही ठिकाणी फायदा, तर काही ठिकाणी फटका बसू शकतो. विशेषतः मोदींचा प्रभाव किती राहणार, यावर सत्ताधारी आणि विरोधकांची गणिते अवलंबून असतील. एकत्र लढल्यास भाजपमधील अंतर्गत धुसफूस शमवण्यास फायदा होऊ शकतो, असे आडाखे बांधले जात आहेत. तीच स्थिती काँग्रेसबाबत होऊ शकते.

Maharashtra Politics
Kolhapur Riots : दंगलीनंतर मुस्‍लिम बोर्डानं घेतला मोठा निर्णय; 200 मशिदींतून मौलवींनी केलं 'हे' आवाहन

भाजपची सावध चाल

भाजपने लोकसभा निवडणूक प्रमुख निवडताना सावध आणि हुशारीने चाल खेळली आहे. सांगलीत दीपक शिंदे यांच्याकडे सूत्रे देण्यामागे नव्या-जुन्यांचा समन्वय, ही महत्त्वाची बाब लक्षात घेतली आहे. श्री. शिंदे भाजपचे जुने शिलेदार आणि लोकसभा लढलेले नेते आहेत.

खासदार संजय पाटील यांच्याविरोधात सध्या अंतर्गत धुसफूस होतेय, ती शांत करण्याचे कसब त्यांना दाखवावे लागेल. हातकणंगले मतदार संघाचे प्रमुख म्हणून शिराळ्याचे सत्यजित देशमुख काम पाहतील. या मतदार संघातील सगळे इच्छुक कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तो ताण नियंत्रित करण्याचे काम डोंगरी शिराळ्यातील नेतृत्वावर सोपवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.