Sharad Pawar : बजरंग सोनवणेंचा शरद पवार गटामध्ये प्रवेश; पंकजा मुंडेंच्या विरोधात पवारांचा उमेदवार?

Beed Loksabha Election : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. बीड लोकसभा मतदारसंघाकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपने दुसरी यादी जाहीर करुन बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं आहे. विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्याऐवजी पंकजांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.
bajarang sonawane pankaja munde
bajarang sonawane pankaja mundeesakal
Updated on

Beed Loksabha Election : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. बीड लोकसभा मतदारसंघाकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपने दुसरी यादी जाहीर करुन बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं आहे. विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्याऐवजी पंकजांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.

बीडमध्ये भाजपने पंकजा मुंडेंसारखा तगडा उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार, यावर तर्क लढवले जात होते. त्यातच आता अजित पवार गटातून शरद पवार गटामध्ये बजरंग सोनवणे यांनी प्रवेश केला आहे. तेच बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार असतील, असं स्पष्ट होतंय.

बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत. अजित पवारांनी पक्षातून बंड केल्यानंतर त्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पावारांसोबत जाणं पसंत केलं होतं. ते धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. तरीही त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.

bajarang sonawane pankaja munde
Jaggi Vasudev Brain Surgery : जग्गी वासुदेव यांच्यावर झाली इमर्जन्सी ब्रेन सर्जरी; पाहा शस्त्रक्रियेनंतरचा Video

बजरंग सोनवणे यांनी बुधवारी सायंकाळी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बीड जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर, महेबूब शेख, उषा दराडे यांच्यासह शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्याने तेच महाविकास आघाडीचा उमेदवार असतील, हे निश्चत मानलं जात आहे. असं असलं तरी मागच्या काही दिवसांपासून दिवंगत मराठा नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचं नाव आघाडीवर आहे.

bajarang sonawane pankaja munde
Holi 2024 Bank Holidays : विकेंडला तीन दिवस बँका बंद राहणार? जाणून घ्या कधी असेल सुट्टी

ज्योती मेटे यादेखील शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील, असं सांगितलं जातंय. तसं झालं तर लोकसभेची उमेदवारी सोनवणेंना मिळणार की मेटेंना? असा प्रश्न उपस्थित होतोय. भाजपने पंकजा मुंडे यांना मैदानामध्ये उतरवलं आहे. मात्र दरवेळीप्रमाणे विरोधी पक्षाकडे तगडा उमेदवार नसल्याचं चित्र सध्यातरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.