Lok Sabha Election 2024 : जागावाटपाचा तिढा सुटला? संभाव्य उमेदवारांची यादी भाजप हायकमांडकडे सादर? कोणाला मिळणार संधी

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी शिवसेना शिंदे गटाकडून दिल्लीत सादर करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या 13 उमेदवारांचा समावेश असलेली यादी काल रात्री दिल्लीत पाठवल्याची माहिती समोर येत आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Esakal
Updated on

Maharashtra Political News : देशात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अशातच घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपाचा तिढा सोडवण्यात सर्व पक्ष काम करत आहेत. अशातच राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा पेच कायम आहे. भाजपने आपल्या पहिल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. अशातच शिवसेनेला १३ ते १६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशातच मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी शिवसेना शिंदे गटाकडून दिल्लीत सादर करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या 13 उमेदवारांचा समावेश असलेली यादी काल रात्री दिल्लीत पाठवल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी भाजप हायकमांडकडे सादर करण्यात आल्याची माहिती साम टिव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

Loksabha Election 2024
आचारसंहितेचा अडथळा नसतानाही शेतकऱ्यांना मिळेना दुष्काळी मदत! सोलापूर जिल्ह्यातील ५.१९ लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ६० हजार शेतकऱ्यांचीच यादी अपलोड

महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आता दिल्लीतच सुटणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीच्या काही जागावर पेच कायम असल्याने हा पेच सोडवण्यासाठी लवकरच तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत अमित शहा यांच्याशी बैठक होणार असल्याची माहिती आहे.

Loksabha Election 2024
जिल्हा परिषदेवरील प्रशासकाला २ वर्षे पूर्ण! पदाधिकारी नसल्याने 'आमदार बोले अन्‌ प्रशासन हाले' अशीच स्थिती; प्रशासक अजून एक वर्षभर राहणार

कोणत्या जागांचा तिढा अजूनही कायम?

  • दक्षिण मुंबई

  • उत्तर पश्चिम मुंबई

  • उत्तर मध्य मुंबई

  • रत्नागिरी -सिंधुदुर्ग

  • ठाणे

  • धाराशिव

  • गडचिरोली

  • भंडारा - गोंदिया

  • अमरावती

  • परभणी

  • सातारा

  • नाशिक

Loksabha Election 2024
सोलापूर शहरातील १४ महिन्यांतील स्थिती! दररोज एका वाहनाची चोरी; २ दिवसांतून १ घरफोडी अन्‌ महिन्यात सरासरी ३ जबरी चोऱ्यांचीही नोंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()