Loksabha Election 2024: तुझं माझं जमेना अन्..! वंचित कार्ड मविआसाठी हुकुमाचा एक्का? प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेसशी का जुळत नाही?

Loksabha Election 2024: 2024 हे निवडणुकांच वर्ष आहे. या वर्षात लोकसभा आणि विधानसभा ह्या महत्वाच्या निवडणुका आहेत. मात्र संपूर्ण देशाचे लक्ष आहेत ते महाराष्ट्रावर. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाला. या दोन्ही पक्षाचे आता दोन गट आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट, हे दोन्ही गट आज भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी येणारी निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे.
Loksabha Election 2024-Maharashtra politics news-BJP plan-Maha Vikas Aghadi Prakash Ambedkar Discussion-vanchit-seat allocation
Loksabha Election 2024-Maharashtra politics news-BJP plan-Maha Vikas Aghadi Prakash Ambedkar Discussion-vanchit-seat allocation
Updated on

Loksabha Election 2024

2024 हे निवडणुकांच वर्ष आहे. या वर्षात लोकसभा आणि विधानसभा ह्या महत्वाच्या निवडणुका आहेत. मात्र संपूर्ण देशाचे लक्ष आहेत ते महाराष्ट्रावर. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाला. या दोन्ही पक्षाचे आता दोन गट आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट, हे दोन्ही गट आज भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी येणारी निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेससोबत  शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार आहेत. मात्र आता घोडं अडलं ते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर, वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी मुंबईत बैठका सुरु आहेत. मात्र मार्ग निघत नाही.

दरम्यान महाविकास आघाडीला वंचितची गरज का आहे? आणि प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ठाम का आहे. त्यात लवचिकता का नाही. हे प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चिंध्या झाल्या आहेत. दोन प्रादेशिक पक्षांचे चार गट झाले आहेत. त्यामुळे  मतदार देखील संभ्रमात आहे. त्यामुळे विरोधकांना त्यांची कार्यशैली ठरवण्याची खास गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांनी देखील त्याचा सामना हा भाजप आणि आरएसएसशी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येणारी निवडणूक वंचितने संधी म्हणून घ्यावी, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

२०१९ मध्ये सुद्धा वंचित आणि महाविकास आघाडी युतीची चर्चा रंगली होती. मात्र ऐनवेळी चर्चा फिस्कटली प्रकाश आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्याशी बोलण्याचा हट्ट धरला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र एकही उमेदवार निवडून आला नाही पण आंबेडकरांनी १३ कोंटींच्या महाराष्ट्रात ५० लाख मते मिळवली याचा फटका, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बसला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसते उमेदवार पडले आणि फायदा भाजप-शिवसेना युतीला झाला होता. राजू शेट्टी देखील वंचित इफेक्टमुळे निवडणूक हारले होते. त्यामुळे वंचितने आपली ताकद दाखवून दिली. फक्त त्यांना गरज होती मदतीची ती मदत त्यांना युतीमुळे मिळाली असती.

स्वतंत्र लढून वंचितला कधीही जिंकता येणार नाही. हे राजकीय सत्य आहे. कारण स्वत: प्रकाश आंबेडकर यांना देखील अकोला आणि सोलापूर दोन ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला होता. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव आढळराव पाटील, राजू शेट्टी, अनंत गीते अशा दिग्गज नेत्यांचा धक्कादायक पराभव झाला होता. अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने खाल्लेल्या मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १२ पेक्षा जास्त जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दरम्यान यावेळी राजकीय परिस्थिती संपूर्ण बदलली आहे. महाविकास आघाडीला वंचितला सोबत घेणे घरजेचे आहे. राज्यात वंचितची ताकद आहे हे कोणीही नाकारु शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना सामजस्याची भूमिका घ्यावी लागेल. जेष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी या सर्व राजकीय विषयावर सकाळशी संवाद साधला.

राजकीय गेम भाजपच्या बाजूने-

भाजप सध्या राजकीय दुष्ट्या मजबूत आहे. बिहारमधील सत्तापालट असेल किंवा राम मंदिर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढलेले महाराष्ट्र दौरे, कोस्टल वे शुभारंभ, शिवडी नाव्हा अटल सेतू उद्घाटन,  सोलापूर, पुणे याठिकाणी मोदी आले होते. त्यामुळे सर्व राजकीय गेम भाजपच्या बाजूने आहे. कारण यापूर्वी महाविकास आघाडीला पहिला अंदाज होता की ४८ पैकी ३८ जागा तरी मिळतील मात्र तो आकडा आता ३० पर्यंत आला आहे. मराठा हा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी पळवला, याचाही फायदा भाजपला होऊ शकतो.

प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंना जुना विरोध -

प्रकाश आंबेडकर यांनी सुरवातील १२ जागांचा वक्तव्य केलं होतं. पण त्यानंतर सुरवातील कोणीही वेगवेगळे दावे करतात असे ते म्हणाले होते. म्हणजे ते जरा खाली आले होते.नंतर त्यांनी आपल्या दोन ज्यूनिअर सहकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या बैठकीत पाठवलं. ज्यांना फारसी मान्यता देखील नव्हती. यावेळी इतर पक्षांचे मोठे नेते बैठकीत होत. त्यानंतर आज (शुक्रवार) ते मुंबईत बैठकीला आले. त्यानंतर ते म्हणाले मी आघाडीत नाही मी शिवसेना आणि राष्ट्रवादीबरोबर आहे. त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं नाही.

कारण महाविकास आघाडीने दिलेल्या पत्रावर नाना पटोले यांचे नाव होते आणि त्यांना प्रकाश आंबेडकरांना विदर्भातील जुना विरोध आहे. नाना पटोलेंना कुठलाही अधिकार नाही पत्रावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्या देखील सह्या पाहीजेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे ह्या ज्या आडमुठ्या भूमिका प्रकास आंबेडकर घेत आहेत तरी देखील महाविकास आघाडीला त्यांना सांभाळून घ्याव, लागले, अशी स्थिती सध्या असल्याचे हेमंत देसाई म्हणाले.

Loksabha Election 2024-Maharashtra politics news-BJP plan-Maha Vikas Aghadi Prakash Ambedkar Discussion-vanchit-seat allocation
Shivsena MLA Disqualification वर Sharad Pawar महत्वाचं बोलले | Eknath Shinde vs Uddhav Thackeray

महाविकास आघाडीला वंचितची खूप गरज-

प्रकाश आंबेडकर यांना महायुतीत सध्या जागा नाही. तिथं आधीच तीन पक्ष आहेत. पण त्यांना महायुतीची बी टीम बनायचं असेल महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी तर यात दोघांनाही एकमेकांची गरज आहे. यापूर्वी देखील वंचितने असं केलं आहे. त्यांच्यावर तशे आरोप देखील झाले आहेत. वंचित आतापर्यंत महाविकास आघाडीशिवाय स्वतंत्रपणे लढली. भाजपला त्यांनी अप्रत्यक्ष मदत केली आहे. असं करुन ते महाविकास आघाडीचा मार्ग रोखू शकतात. पण आता महाविकास आघाडीला वंचितची खूप गरज आहे. कारण २०१९ मध्ये महाविकास आघाडीला १२ जागांवर फटका बसला होता. त्यामुळे एक किंवा दोन जागा त्यांना द्याव्या लागतील. प्रकाश आंबेडकर यांनी आता स्पष्ट भूमिका घेतली आहे की आता भाजपा आणि मोदींना त्यांचा विरोध आहे.

काँग्रेसशी प्रकाश आंबेडकरांचं का जुळत नाही -

२०१९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत भेटण्याचा हट्ट धरला होता. यावर हेमंत देसाई म्हणाले, प्रकाश आंबेडकर व्यक्तिमत्वाचा अंदाज कुणाला लागला नाही. त्यांच्या थेट टिका करण्याचे विरोधक देखील टाळतात. डॉ बाबासाहेब आंडेकर यांचे नातू असल्याचा त्यांना फायदा होतो. पण त्यांच्या त्यांच्याकडून रोखठोक, प्रांजळ आणि स्पष्ट भूमिका घेणे गरजेचं आहे. प्रकाश आंबेडकर यावेळी नेहमीपेक्षा वेगळी भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे. कारण संविधानासाठी लढाई आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी संविधान रक्षकाची भूमिका त्यांना घ्यावी लागले. अशी भूमिका घेतली नाही तर २०१९ च्या लोकसभेतील ताकद जशी विधानसभेत कमी झाली ती आणखी कमी होईल. आज वंचितची ताकद आहे पण आता दोघांनाही सलोख्याची भूमिका घ्यावी लागले. वंचितला जर सोबत घेतलं नाही तर महाविकास आघाडीला देखील मोठा फटका बसेल, असे हेमंत देसाई म्हणाले.

Loksabha Election 2024-Maharashtra politics news-BJP plan-Maha Vikas Aghadi Prakash Ambedkar Discussion-vanchit-seat allocation
CM Of Jharkhand: राजकारणाची खाण झारखंडचं राजकारण...23 वर्षात 12 CM, फक्त एका मुख्यमंत्र्याने पूर्ण केला कार्यकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.