Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath Shindeesakal
Updated on

मुंबईः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करत आहेत, असा आरोप करत शिवसेनेने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगात आणि पोलिसात धाव घेतली आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी जेजे पोलिस ठाण्यात मध्यरात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी पत्रकार परिषदेतून ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मुंबईतल्या ३७ मशिदीतून फतवे काढले जात आहेत, बॅनर लावले जात आहेत, ठाकरे गटाला समर्थन देण्यासाठी आवाहन केलं जातंय. निवडणुका शांतपणे झाल्या पाहिजेत, पण मागच्या वर्षभरापासून विश्वप्रवक्ते बोलत होते की दंगली घडतील, हे ते का बोलत होते? असा सवाल पावसकरांनी राऊतांना उद्देशून केला.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Swati Maliwal Assault Case : केजरीवालांच्या निवासस्थानातून पोलिसांनी CCTV DVR केलं जप्त; पुरावे गोळा करुन टीम रवाना

किरण पावसकर पुढे म्हणाले की, अल्पसंख्याक हेसुद्धा शिवसेनेसोबत आहेत. पण त्यांचा वापर करुन घेणारे काही लोक आहेत, ही शरमेची गोष्ट आहे. दंगली घडवण्याचा मार्ग आमचा नाही पण रात्री १:३० वाजता जेजे पोलिस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत काही बोर्ड लावले जात आहेत, फतवे जारी केले जात आहेत आणि ३७ मशिदीतून मोदींना पंतप्रधान न होण्यासाठी फतवे काढले जात आहेत. मुंबईतल्या धार्मिक संस्था मत कोणाला द्यावे, हे सांगत आहेत आणि आम्ही उबाठाला सपोर्ट करतोय हे सांगत आहेत, या गंभीर प्रकाराची चौकशी झाली पाहिजे.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Nashik Lok Sabha Election : नाशिककरांनो, निर्भयपणे मतदान करा! पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे सोशल मीडियावरून आवाहन

पावसकरांनी दंगली करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. ते कोणाच्या डोक्याने करत आहे स्वतःच्या की उद्धव ठाकरेंच्या हे तपसालं पाहिजे. मशिदी तोडल्याच नाहीत, तरीही तसं सांगितलं जातंय. जे झालचं नाही त्याचा बोर्ड लिहतात व उबाठाला मतदान करा, असं सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.