'लोकसभा आणि विधानसभेसाठी लवकरच आचारसंहिता लागू होईल. देशात सात टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याची आमच्यापर्यंत माहिती आहे.'
कोल्हापूर : लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) सात टप्प्यांत होणार आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच आचारसंहिता जाहीर केली जाऊ शकते, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी येथे दिली. बाजार समिती येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, ‘‘लोकसभा आणि विधानसभेसाठी लवकरच आचारसंहिता लागू होईल. देशात सात टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याची आमच्यापर्यंत माहिती आहे. तीन ते चार महिने निवडणुकीत जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत.’’
जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस क्रमांक एकचा पक्ष बनण्यासाठी करवीर आणि हातकणंगले तालुक्यात जास्तीतजास्त निधी देऊन सदस्य संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळतात; पण, राष्ट्रवादीमुळेच त्यांचा अध्यक्ष होतो. करवीर आणि हातकणंगले तालुक्यात आपण कमी पडत आहोत. या दोन्ही तालुक्यात जास्तीजास्त निधी दिला पाहिजे. यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावरच राहत आहे. आता राष्ट्रवादीचा अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यावेळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आदिल फरास उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या राज्याभिषेकाला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने जिल्ह्यात `उत्सव शिवजन्माचा सुराज्य कार्यालयाचा आणि जिजाऊच्या जीवनाचे राज्य जनतेचे’ हा सप्ताह घेतला जाणार आहे. सोमवारपासून (ता. १२) जिल्ह्यात स्वराज्य पताका लावल्या जाणार, सेल्फी वुथ किल्ला, महाराजांचे शपथ पत्र वाटप असे कार्यक्रमही होणार आहेत. रांगोळी, वकतृत्व स्पर्धा, चित्र प्रदर्शन, शिवकालिन वस्तूंचे प्रदर्शन, बाईक रॅलीचे नियोजन केले आहे. सर्व उपक्रम रविवार (ता. १८) पर्यंत घेतले जाणार आहे, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या विविध पदांवरील नियुक्तीसह विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदे द्यावीत. राष्ट्रवादीची पदे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ठरवावीत आणि शिवसेनेची पदे ठरविताना खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना विचारावे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनाही या पदांबाबत विचारात घेवून ही पदे वाटप करावीत, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.