Loksabha Politics : लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसे सज्ज ; हे असतील संभाव्य उमेदवार

raj Thackeray
raj Thackeray esakal
Updated on

Loksabha Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेना येऊ घातलेली लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात असून यासाठी मनसे आपल्या फायर ब्रँड नेत्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवेल असे म्हटले जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निहाय बैठका घेत आहेत. या बैठकांच्या सत्रांमध्ये विविध लोकसभा मतदार संघांचा आढावा खुद्द राज ठाकरे घेत आहेत. यामुळे आता मनसे लोकसभेच्या निवडणुका लढण्यासाठी सज्ज झाली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

एका बाजूला महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणजेच शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस अश्या आघाड्यांविरुद्ध मनसे एकट्याने निवडणूक लढणार असल्यामुळे मनसे नक्की निवडणूक कशाप्रकारे लढवायची आणि त्या ठिकाणी कोणाला उमेदवार उभा करायचा याची चाचपणी करत आहे.

मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील हे कल्याण लोकसभा निवडणूक लढवतील असे म्हटले जात आहे. तर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव किंवा अभिजीत पानसे हे ठाणे लोकसभा निवडणूक लढवतील असे चित्र पाहायला मिळत आहे.

raj Thackeray
Raj Thackeray: उत्सवांना आता बिभत्स स्वरूप येतंय; राज ठाकरेंनी घातला महत्त्वाच्या मुद्याला हात

दक्षिण मध्य मुंबई मधून नितीन सरदेसाई, दक्षिण मुंबई मधून बाळा नांदगावकर, पुण्यामधून वसंत मोरे निवडणूक लढवतील असे म्हटले जात आहे. ईशान्य मुंबई मधून संदीप देशपांडे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरतील असे म्हटले जात आहे.

याचबरोबर नाशिक, औरंगाबाद, सोलापूर ,चंद्रपूर आणि रायगड म्हणून मनसे आपले उमेदवार उतरवेल असे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र याविषयी अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाहीये.

मनसेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढण्यासाठी तयार आहे. लवकरच याबाबतची माहिती खुद्द राज ठाकरे हे प्रसार माध्यमांना देतील असे म्हटले जात आहे.

raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा घुमजाव? मनसे लोकसभा निवडणूक लढवणार.. तयारी सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.