Bhushi Dam: भुशी डॅम जवळ वाहून गेलेल्या कुटुंबासाठी प्रत्येकी 5 लाखांची भरपाई; अजित पवारांची घोषणा

लोणावळ्यातल्या भुशी डॅमच्या पाण्यातील प्रवाहात काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले होते.
Bhushi Dam Lonavala News in marathi
Bhushi Dam Lonavala News in marathi esakal

मुंबई : लोणावळ्यातल्या भुशी डॅमच्या पाण्यातील प्रवाहात काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले होते. या दुःखदायक घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं या कुटुंबाच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. त्यानुसार, मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ५ लाख रुपये देण्यात येणार आहे. (Lonavala Bhushi Dam compensation 5 lakhs each for families washed away Ajit Pawar announcement)

Bhushi Dam Lonavala News in marathi
Ladki Bahin Scheme: 'लाडकी बहीण'साठी आता घरबसल्या करता येणार अर्ज! नवं अ‍ॅप सुरु; जाणून घ्या कसा भरायचा अर्ज?

विधानसभेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या मदतीची घोषणा केली. अजित पवार म्हणाले, लोणावळ्यातील भुशी डॅम इथं एकाच कुटुंबातील पाच लोकांचा वाहून गेल्यानं मृत्यू झाला. त्यांच्या घरी लग्नकार्य होतं त्यामुळं हे लोक पुण्यात आले होते. या घटनेची माहिती कळताच मी लगेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना तातडीनं घटनास्थळी पाठवलं होतं. त्यानंत त्यांनी घटनास्थळाची पाहाणी केली. या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत त्यांना केली जाईल, अशी घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली.

Bhushi Dam Lonavala News in marathi
Hathras Stampede: हाथरस येथील चेंगराचेंगरीचं कारण येणार समोर? तज्ज्ञांमार्फत चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील धोकादायक ठिकाणी बोर्ड लावण्याच्या सूचना अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. तसंच पावसाळी पर्यटनस्थळी सुरक्षेचा विचार व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील, असंही अजित पवार यांनी यावेळी सभागृहात सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com