Traffic Jam : Long Weekend मुळं पुणे-बंगळुर महामार्ग जाम; 'या' मार्गावर काय आहे स्थिती?

शनिवार, रविवार आणि सोमवार (1 मे कामगार दिन) अशी सलग सुट्टी असल्यामुळं लोक बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करत आहेत.
Long Weekend Update
Long Weekend Updateesakal
Updated on
Summary

शनिवार-रविवार-सोमवार अशी जोडून सुट्टी असल्यामुळं लोक फिरायला जायचा प्लान आखत आहेत, त्यामुळं पुढील तीन दिवस पुणे-बंगळुरु महामार्ग (Pune-Bangalore Highway) ठप्प होण्याची शक्यता आहे.

Long Weekend Update : सातारा बाजूकडून जाणारा खंबाटकी घाट आज (शनिवार) सकाळी आठपासून जाम झाला आहे. येथील मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झालीये. त्यातच Long Weekend असल्यामुळं मार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.

पुणे-बंगळुर महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) मुंबई-पुणे, सांगली-इस्लामपूर, कोल्हापूर-बेळगांव, सातारा-कराड रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झालीये. कराडजवळ सहापदरीकरणाचं काम सुरू झालं असून या कामामुळं कोल्हापूर, पुणे, सांगलीकडं होणारी वाहतूक विलंबानं सुरु आहे.

Long Weekend Update
Bazar Samiti Result : पंढरपूर बाजार समितीवर भाजपच्या माजी आमदाराचं वर्चस्व; 18 उमेदवार विजयी

त्यातच आता शनिवार आणि रविवार अशी जोडून सुट्टी असल्यामुळं रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा पहायला मिळाल्या. खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होत आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार (1 मे कामगार दिन) अशी सलग सुट्टी असल्यामुळं लोक बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करत आहेत.

Long Weekend Update
Bazar Samiti Result : सांगलीत 'मविआ'कडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; मंत्री, खासदार मैदानात उतरुनही झाला पराभव

शनिवार-रविवार-सोमवार अशी जोडून सुट्टी असल्यामुळं लोक फिरायला जायचा प्लान आखत आहेत, त्यामुळं पुढील तीन दिवस पुणे-बंगळुरु महामार्ग (Pune-Bangalore Highway) ठप्प होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातही सध्या महामार्गाचं काम जोरात सुरु असून काही ठिकाणी वाहतूक ठप्प होताना दिसत आहे, त्यामुळं वाहनधारकांना ट्राफिक जामचा त्रास सहन करावा लागत आहे.

Long Weekend Update
Karnataka : काँग्रेसनं 91 वेळा मला शिव्या दिल्या, त्यांनी आंबेडकर-सावरकरांनाही सोडलं नाही; मोदींचा हल्लाबोल

दरम्यान, कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. कारण, कर्नाटकात 10 मे रोजी मतदान असल्यामुळं आणि अचारसंहिता लागू झाल्यामुळं कोगनोळी टोलनाक्यावर तपासणी केली जात आहे. या प्रकारामुळं महाराष्ट्रातील वाहनधारक आपला कर्नाटकातील प्लान रद्द करत आहेत. तर गोवा, कोकणाला लोक सर्वाधिक पसंती देत आहेत. एकूणच Long Weekend मुळं महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.