Machchhindragad: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदार फक्त इतकेच म्हणेल.."पुरे हा बनवाबनवीचा खेळ...!

Sangali: राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा या चारही प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सत्तेत सहभाग राहिला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदार फक्त इतकेच म्हणेल.."पुरे हा बनवाबनवीचा खेळ...!
Machchhindragad: sakal
Updated on

Politcal News: पक्षीय राजकारणात वरचढ ठरणाऱ्र्याना रोखण्यासाठी तीन-चार वर्षापुर्वी सर्वच राजकिय पक्षाच्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी "तुझ्या गळा माझ्या गळाचा... चा राग आळवित "आमचं ठरलंय... चा प्रयोग करीत ग्रामपंचायतीत एकमेकाची जिरवाजिरवी केली. त्यामुळे सांगली जिल्ह्यासह वाळवा तालुक्यातील बहुताशी ग्रामपंचायतीच्या सत्तेत जिंकले कोण आणि हरले कोण यापेक्षा "जिरविली कुणाची... या तत्वाने राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा या चारही प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सत्तेत सहभाग राहिला. तो कुठे उघडपणे दिसला तर काही ठिकाणी छुप्या स्वरूपात असल्याचे दिसून आले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदार फक्त इतकेच म्हणेल.."पुरे हा बनवाबनवीचा खेळ...!
Sangali Lok Sabha Result: विशाल पाटलांचा बंड यशस्वी?, मतमोजणीत अव्वल! 54 हजार मतांनी आघाडीवर

तीनवर्षापूर्वी झालेल्या कृष्णा कारखाना निवडणुकीत "आधे लोग ईधर जाओ... आधे लोग उधर जाओ... करीत वाळवा तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते संस्थापक, रयत, सहकार पॅनेलमध्ये सामावलेले दिसून आले. सहकार पॅनेलने उघडपणे नसेल परंतु निवडणुकीनंतरची भाजपशी झालेली सलगी पाहता भाजपाचे पॅनेल म्हणून निवडणूक लढविली असे म्हणावे लागेल. "आमचं जमतंय... चा होरा मनी बाळगीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्यांनी तिन्ही पॅनेलला मदत केली.

सत्तेवर आलेल्या सहकार पॅनेलमध्येही तीन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांचे बस्तान बसले. त्यांच्या आडून हरलेल्या संस्थापक, रयत पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी जवळीक साधत आपले राजकिय स्थान शाबूत ठेवले. यात सामान्य मतदारांना वाऱ्यावर सोडले गेल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात दुखावला गेला.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते. त्या तत्पुर्वी या निवडणुकात मतदारांना गृहीत धरुन दलबदलूपणाचे राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदार किती जवळ करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण व्यक्तीगत स्वार्थासाठी ग्रामपंचायत, सोसायटी, कारखाना निवडणुकीत मनोमिलनाचे नाट्य करीत संधीसाधुपणाचे राजकारण करायचे आणि स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच हाती पक्षाचा झेंडा घेऊन "तुझ्यावाचून करमेना...चे" विरह गीत गात मतदाराच्या दारी मताचा जोगवा मागत फिरायचे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदार फक्त इतकेच म्हणेल.."पुरे हा बनवाबनवीचा खेळ...!
Sangali Loksabha: सांगलीत विशाल पाटील एकाकी? मित्रपक्षांना इशारा देत विश्वजीत कदमांचा आघाडीचे काम करण्याचा निर्णय

या असल्या दळभद्रेपणामुळे मतदारांची मने विटाळली आहेत. कार्यकर्ते फक्त आपल्या आर्थिक लाभासाठी सत्ताधाऱ्याशी जवळीक साधून आपली टेंडर पास करून घेऊन घरची आणि आप्तस्वकियांची बेरोजगारी दूर करण्याची संधी साधतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात. हे सर्व जनतेने आता ओळखले असून जनता आता भुलण्याच्या मनःस्थितीत नाही. हे सर्व पक्षीय नेते संपर्क दौऱ्यात गाव भेटीसाठीस आल्यानंतर पाच-पन्नास मतदार जमा होत होतील हे पाहणे उचित ठरेल.

सत्तर-ऐंशीच्या दशकातील राजकारणाचा काळ असा होता की, ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत कार्यकर्ता पक्षाशी, पक्षाच्या धोरणाशी एकनिष्ठ असायचा तेव्हा मतदारही प्रामाणिक राहायचा, राजकिय सदाचार पाळला जायचा. गावात एकच व्यासपीठ उभारले जायचे, त्याच व्यासपीठावर जनता पक्ष, कॉंग्रेस, शेकाप, इतर पक्षीय नेत्यांच्या आळीपाळीने सभा व्हायच्या आणि निवडणूकीत जिंकणाऱ्या पक्षाची विजयी सभाही याच ठिकाणी व्हायची.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदार फक्त इतकेच म्हणेल.."पुरे हा बनवाबनवीचा खेळ...!
Sangali Lok Sabha: सांगलीसाठी शिवसेनेनं जोर का लावला? काँग्रेसची पिछेहाट का झाली? जाणून घ्या

हल्ली अशा सभा होत नाहीत आणि राजकिय सदाचारही उरला नसल्याने तो पाळलाही जात नाही. त्यामुळे हल्ली चारचौघाचा ग्रुप जरी भेटीसाठी आला तरी नेत्यांना त्यांचेशी चर्चा करावी लागते आणि वाडीवस्तीवरील दहावीस मतदारांनी भेटीसाठी बोलविले तरी पाय धूळ झाडीत खेटे मारावे लागतात.

हे फलित नेत्यांचे नाही तर प्रसंगानुसार आपली राजकिय भुमिका बदलणाऱ्या कार्यकर्त्यांनी उधळलेल्या गुणदुर्गुणाचे आहे. हे नेत्यांच्या लक्षात आले असेल तर, संधी साधुपणाचे राजकारण करणाऱ्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना हातभर दूर ठेवून सतरंज्या उचलणाऱ्यां तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी. अन्यथा आजपर्यंत सतत आश्वासनाच्या खैरातीत फसत आलेला मतदार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये फक्त इतकेच म्हणेल.."पुरे हा बनवाबनवीचा खेळ...!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदार फक्त इतकेच म्हणेल.."पुरे हा बनवाबनवीचा खेळ...!
Sangali Lok Sabha: सांगलीसाठी शिवसेनेनं जोर का लावला? काँग्रेसची पिछेहाट का झाली? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.