Maharashtra Police: शहीद पोलिसांच्या पत्नींसाठी सरकारचा मोठा निर्णय; शासन आदेश प्रसिद्ध

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद पत्नींच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Police
Maharashtra Policeesakal
Updated on

मुंबई : कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या पोलिसांच्या विधवा पत्नीनं जर नंतर पुनर्विवाह केला तर तिला शासनाकडून मिळणार वेतन रोखलं जात होतं. पण अशा विधवांना दिलासा दिलासा देण्याचा निर्णय राज्याच्या गृहविभागानं घेतला आहे. (Maha Govt big decision for wives of martyred cops who remarried)

Maharashtra Police
Chandani Chowk Inauguration: पुण्यातून पेट्रोल-डिझेल हद्दपार करणार; गडकरींची घोषणा

शासन निर्णयात म्हटल्याप्रमाणं, आपत्कालिन परिस्थितीत मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या विधवांसाठी पुन्हा वेतन सुरु करण्यात येणार आहे. अनेक शहीद पोलिसांच्या पत्नीनं याबाबत तक्रारी केल्या होत्या की, पुनर्विवाह केल्यानंतर त्यांचं वेतन शासनाकडून बंद करण्यात आलं होतं. शासनाच्या या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यापार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.