Maha Vikas Aghadi : शिवसेना राष्ट्रवादीमध्ये फूट; अंतर्गत वाद चव्हाट्यावर, आव्हाडांच्या ट्विटमुळे चर्चा

Maha Vikas Aghadi
Maha Vikas Aghadiesakal
Updated on

मराठी चित्रपटसृष्टीतील 'हर हर महादेव' चित्रपटावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. ठाण्यातील मराठा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली चित्रपटाविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात आव्हाडांच्या नव्या या ट्विटमुळं शिवसेना राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.(Maha Vikas Aghadi NCP MLA Jitendra Awhad Sharad Pawar Shivsena maharashtra politics crisis )

मराठी चित्रपटसृष्टीतील 'हर हर महादेव' चित्रपटामध्ये इतिहासाची तोडफोड झाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनीही विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर आव्हांड यांनी एक ट्विट केलं आहे. पण त्यामध्ये एकाही शिवसेनेच्या नेत्याचा उल्लेख नसल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

काय म्हटले आहे ट्विटमध्ये?

आपण सगळ्या ज्येष्ठ, श्रेष्ठ नेत्यांनी माझ्या भूमिकेचे समर्थन केले व त्याचबरोबर माझ्या अटकेचा निषेध व्यक्त केलात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. महाराष्ट्राचा इतिहास हे सांगतो कि, शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे कोणिही विकृतीकरण केले तर महाराष्ट्राची जनता कधीच सहन करीत नाही.

तसेच, माझा महाराष्ट्राला आणि आदरणीय शरद पवार साहेबांना शब्द आहे कि, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जो कोणी छत्रपतींच्या इतिहासाचे विकृतीकरण करेल त्याच्याविरोधात उभा राहणार. माणूस कितीही मोठा असो…असा इशारादेखील दिला.

हे ट्विट करताना आव्हाड यांनी सुप्रिया सुळे, जयंत पाटील, निलेश लंके, अमोल मिटकरी, दिलीप वळसे पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकून, श्रीमंत कोकाटे या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला. पण शिवसेनेच्या नेत्यांचा उल्लेख न केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

आव्हाड यांना अटक अन् सुटका

हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडत असताना मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. तसेच त्यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने आव्हाड यांच्या वकिलांचा जामीन अर्ज मान्य केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.