महादरे बनलं देशातील फुलपाखरांचं पहिलं गाव; जैवविविधतेत साताऱ्याचा डंका

Butterfly
Butterflyesakal
Updated on
Summary

साताऱ्याच्या जैवविविधतेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

कलेढोण (सातारा) : सातारा (Satara) शहराजवळच्या दरे (खुर्द) महादरे येथे पश्चिम घाटातील ३४१ पैकी १७८ फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. या फुलपाखरांच्या आदिवासास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली वन्यजीव मंडळाच्या बैठकीत देशातील पहिल्यावहिल्या फुलपाखरू संवर्धन राखीव केंद्रास (Butterfly) राजमान्यता मिळाली. त्यामुळे साताऱ्याच्या जैवविविधतेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. साताऱ्यातील मेरी संस्थेच्या नवसंशोधकांनी वनविभागाच्या मदतीने हा प्रस्ताव शासनास २०२१ मध्ये सादर केला होता. त्यास नुकतीच मान्यता मिळाली.

सातारा शहराजवळच्या महादरे खोऱ्यात विविध जैवविविधता आढळून येते. त्याचा अभ्यास व संशोधन महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) ही संस्था २०१७ पासून करीत आहे. या संशोधनात पश्चिम घाटात फुलपाखरांच्या ३४१ प्रजातीपैकी १७८ प्रजाती एकट्या महादरेत आढळतात, असे संशोधन झाले आहे. त्यामुळे हा परिसर फुलपाखरासाठी राखीव करावा, असा प्रस्ताव २०२१ मध्ये शासनास सादर केला होता.

Butterfly
भाजप प्रवक्त्यांच्या वक्तव्यानं 14 देश संतप्त; देशासह विदेशातही वाढता विरोध

महादरेत क्रिमसन रोज, मलाबर बँडेड पिकॉक, तमीळ स्पॉटेड फ्लॅट, सदर्न बर्डविंग ही प्रदेशानिष्ठ (एंडेमिक) फुलपाखरे, भारतातील आकाराने सर्वात छोटे स्मॉल ग्रास ज्वेल, तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सदर्न बर्डविंग हे फुलपाखरू, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन, भारतीय वन्यजीव कायद्यांतर्गत संरक्षित असणारी अनुसूची ४ मधील ४, अनुसूची २ मधील १२ आणि अनुसूची १ मधील अर्थात वाघाच्या बरोबरीने संरक्षण असणारी ऑर्किड टिट व व्हाइट टीपड लाइन ब्लू ही दुर्मिळ फुलपाखरे आढळून येतात.

Butterfly
RSS नं गावोगावी जाऊन गोळा केल्या 'चड्ड्या'; काँग्रेसविरोधात सुरु केली 'ही' मोहीम

एकूण १.०७ चौरस किलोमीटर क्षेत्रातील महादऱ्यात फुलपाखरांशिवाय २० प्रकारचे सस्तन वन्यप्राणी, ११८ प्रकारचे पक्षी, १६ सरपटणाऱ्या प्रजाती, २२ प्रकारचे मासे, ३ सहस्त्र पाद प्रजाती, ८० पतंग प्रजाती , ११० प्रकारचे कोळी महादरे आढळतात. मेरीचे अध्यक्ष व मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, प्रा. डॉ. प्रतिमा पवार, प्रा. डॉ. नेहा बेंद्रे यांनी मुक्त संशोधकांच्या मदतीने हे संशोधन केले असून, आज मूर्त रूप मिळाले. येणाऱ्या काळात सातारा शहराजवळच्या महादरेत फुलपाखरांच्या प्रजाती संवर्धनासाठी व संरक्षणासाठी शासनाकडून प्रयत्न होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.