Mahadev Jankar Joined Mahayuti : जानकरांचं पुन्हा महायुतीसोबत सूत जुळलं! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत झाला निर्णय

Mahadev Jankar Joined Mahayuti Latest News : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Mahadev Jankar Joined Mahayuti :
Mahadev Jankar Joined Mahayuti :
Updated on

Mahadev Jankar Joined Mahayuti Latest News : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. यादरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री निवसास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आज महायुतीची महत्वाची बैठक झाली. या बैठकीला महादेव जानकर उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी आपण माहायुतीतच असल्याचे जाहीर केलं. तसेच या बैठकीमध्ये महायुतीने रासपला एक जागा सोडणार असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली. महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते.


याच बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असेही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले.

Mahadev Jankar Joined Mahayuti :
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं ठरलं! प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देणार; केवळ मराठाच नव्हे तर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत, असे जानकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासोबतच मी भाजपवर नाराज होतो, पण आता जागा दिल्यामुळे नाराज नाही, असं देखील ते म्हणाले.

एक ते दोन दिवसात कळेल, मला कुठली जागा देणार. मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. मी महाविकास आघाडीला तीन जागा मागितल्या होत्या, पण ते एकच देत होते. भाजप सुद्धा मला एक जागा देत आहे म्हणून मी महायुतीत सामील झालो, असेही महादेव जानकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Mahadev Jankar Joined Mahayuti :
Ankita Lokhande: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटात यमुनाबाईंची भूमिका साकारण्यासाठी अंकितानं किती घेतलं मानधन? जाणून घ्या

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून जानकरांना माढा लोकसभा मतदारसंघ ही जागा देण्यात येईल अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे जानकर महाविकास आघाडीच्या बाजूने लोकसभा लढवणार अशा चर्चा राजकीय वर्तुळास सुरू होत्या.

मात्र आज जानकरांनी महायुतीच्या नेत्यांसोबतच्या बैठकीत सहभागी होत महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. या बैठकील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.