राज्याची विजेची उच्चांकी मागणी पुरवण्यासाठी महानिर्मिती सज्ज

राज्याची विजेची उच्चांकी मागणी पुरवण्यासाठी महानिर्मिती सज्ज
nashik
nashiksakal
Updated on

एकलहरे (जि. नाशिक) : एकीकडे उन्हाच्या तीव्र झळा वाढू लागल्या आहेत तर दुसरीकडे विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज शिखर मागणीच्या कालावधीत (पीक हवर) राज्याची विजेची मागणी 27 हजार मेगावॅट एव्हढी असतांना महानिर्मितीने कोळशाचे दुर्भिक्ष्य अजून ही संपलेले नसतांना तेवढ्याच सक्षमपणे वीज निर्मिती सुरू ठेवली होती.

सध्या औष्णिकसोबत जल विद्युतवर मदार

कोळशा अभावी परळीचा 1, भुसावळचा संच क्रमांक 3, कमी कामगार व अभियंता संख्या असल्याने नाशिकचा 1 संच, तर तांत्रिक कारणास्तव खापरखेडाचा संच क्रमांक 5 असे तीन संच बंद वगळता औष्णिकची व जलविद्युतसह सोलरची वीज निर्मिती सुरू आहे.

गत काही महिन्यांपासून देश भरातील वीज केंद्र कोळसा तुटवड्याला सामोरे जात आहेत. महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रांना किमान आठवड्याभराचा तरी स्टॉक शिल्लक राहावयास हवे असतांना मात्र सध्या रोजच्या रोज किंवा सर्व वीज केंद्रात 2/3 दिवसाचा असून वीज निर्मितीत सातत्य टिकवून औष्णिकची निर्मिती 6250 मेगावॅट निर्मिती सुरू होती. तर औष्णिक सोबत सध्या जल विद्युतवर मदार आहे. कोयना जल विद्युत संच 1/2 मधून 510 मेगा वॅट, संच 3 मधून 315, संच चार मधून 800, के डी पी एच मधून 36, वैतरणा 59 मेगा वॅट अशी 1780 मेगा वॅट वीज निर्मिती सुरू होती.

nashik
नाशिक जिल्ह्यात 9 हजार मुलांना एकाच दिवशी पहिली लस

...तर नाशिकचे तिन्ही संच कार्यान्वित होतील

मुंबई शहराची मागणी 3100 मेगावॅट तर उर्वरित महाराष्ट्राची मागणी 24 हजार 460 मेगा वॅट एवढी होती. एकूण मागणी 27 हजार 562 मेगा वॅट एवढी असतांना राज्याच्या महानिर्मितीसह सर्व स्रोतातून 18 हजार 695 मेगा वॅट वीज निर्मिती सुरू होती तर सेंट्रल सेक्टर मधून 8781 हिस्सा होता. पण वीजेची मागणी अशाच चढत्या श्रेणीत राहिली व कोळसा पुरवठा नियमित होऊ शकला नाही तर मात्र महानिर्मितीला आणखी जास्त प्रमाणात कसरत करावी लागेल.

परळी येथील संच 6 काल रात्री काही तांत्रिक कारणास्तव बंद पडला होता, मात्र युद्धपातळीवर काम करून सकाळी त्यातून वीजनिर्मिती सुरू झाली होती. नाशिकचे संख्याबळ आणखी वाढले तर तीनही संच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकतात.

nashik
उसतोडी दरम्यान आढळले बिबट्याचे पिल्लू; उसतोड कामगार सैरभैर 

''कोळसा तुटवड्याला सामोरे जात असतांना सर्व ठिकाणी कोळशाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे सुरू असल्याने महानिर्मितीचे जास्तीत जास्त संच सुरू आहेत.'' - महेश आफळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.