Mahant Narayangiri: उद्धव ठाकरेंची बाजू घेणाऱ्या शंकराचार्यांना महंत नारायणगिरींचा टोला; म्हणाले, पूजापाठ...

Mahant Narayangiri on Shankaracharya: उद्धव ठाकरेंसोबत राजकारणात दगाबाजी झाली असून ते पुन्हा मुख्यमंत्री बनले तर जनतेला आनंदच होईल, असं विधान बद्रिनाथ ज्योतिर्मठ मीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलं होतं.
Mahant Narayangiri
Mahant NarayangirieSakal
Updated on

नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंसोबत राजकारणात दगाबाजी झाली असून ते पुन्हा मुख्यमंत्री बनले तर जनतेला आनंदच होईल, असं विधान बद्रिनाथ ज्योतिर्मठ मीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलं होतं. पण आता त्यांच्या या विधानावर श्री पंचनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते महंत नारायणगिरी यांनी टोला लगावला आहे. शंकराचार्यांनी राजकारणावर बोलू नये पूजापाठ करावा, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं आहे. (Mahant Narayangiri comment on Shankaracharya swami Avimukteshwaranand statement on Uddhav Thacekray)

Mahant Narayangiri
POCSO Act: झोपेत बिछाना ओला केला म्हणून पोटच्या पोरीच्या गुप्तांगाला दिले चटके! आईवर गुन्हा दाखल

महंत नारायणगिरी म्हणाले, "श्रीशंकराचार्यजी उद्धव ठाकरेंकडे गेले होते. खरंतर शंकराचार्य साधारण व्यक्तींकडे कधी जात नाहीत मात्र उद्योगपतींसारख्या मोठ्या विवाहात जातात. आम्ही शंकराचार्यंचा आदर करतो. पण धर्म आणि राष्ट्रापेक्षा कोणताही मोठा संत नसतो. जय पराजय हे आम्ही सांगायला नको, ते काम जनतेचं आहे, आमचं काम पूजापाठ करण्याचं आहे"

Mahant Narayangiri
Poet Narayan Surve: मला माहीत नव्हतं की... आधी वस्तू चोरल्या मग परत आणून ठेवल्या, कवी नारायण सुर्वे यांच्या घरी चोरीची अजब घटना

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला धोका दिला. नाहीतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनणार होते. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारधारेला तिलांजली दिली आणि विरुद्ध विचारधारेसोबत जुळलेत. शंकाराचार्य अशा लोकांच्या घरी जाऊन म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंना धोका दिला मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदू समाजाला धोका दिला आहे.

आम्ही कोणाला धोकेबाज म्हणतो, विश्वासघातकी म्हणतो, अशी विधानं देताना विचार केला पाहिजे. उद्धव ठाकरे हे विद्रोहींसोबत मिळालेत, त्यांच्या घरी जात त्यांना आशीर्वाद देणं आणि भेट घेणं चुकीचं आहे, असंही महंत नारायणगिरी यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.