Mahaonline Portal : महाऑनलाईन पोर्टल ठप्पच; बारावीनंतरच्या प्रवेशांसाठीही दाखल्यांऐवजी हमीपत्र ग्राह्य धरावे

राज्य शासनाने अकरावीच्या प्रवेशासाठी काही दाखल्यांऐवजी हमीपत्र वा पोचपावती घेऊन प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.
Mahaonline portal
Mahaonline portalesakal
Updated on

सोमेश्वरनगर - राज्य शासनाने अकरावीच्या प्रवेशासाठी काही दाखल्यांऐवजी हमीपत्र वा पोचपावती घेऊन प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र बारावीनंतरचे प्रवेश व डिप्लोमाचे प्रवेश घेण्यासाठी अजूनही सर्व दाखले सक्तीचेच आहेत.

दुसरीकडे सदर दाखले देणारे 'महाऑनलाईन पोर्टल'चे काम अजूनही ठप्पच आहे. त्यामुळे बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांचे भवितव्यच अक्षरशः टांगणीला लागले असून पालक हतबल झाले आहेत. त्यामुळे बारावीनंतरच्या प्रवेशानाही दाखल्याऐवजी हमीपत्रावर प्रवेश द्यावा अशी मागणी होत आहे.

राज्य शासनाच्या महाऑनलाईन पोर्टल मध्ये सर्व शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा आहे. अर्ज स्वतः किंवा महा-ई-सेवा केंद्रातून दाखल केल्यानंतर तहसील कचेरीत त्याला मंजुरी मिळणार आणि मग डाऊनलोड होणार आहे. मात्र गुरुवारपासून पुन्हा एकदा दाखल्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया गप्प झाली आहे. दोन दिवसात अनेक सेतू केंद्रातून एकही दाखल गेला नाही. सेतू केंद्रचालक, कचेरीतील लोक आणि विद्यार्थी-पालक रात्र रात्र जागे रहात आहेत.

दरम्यान राज्यसरकारने अकरावीच्या प्रवेशासाठी नॉन क्रिमीलेअर व ई डब्ल्यू एस या दाखल्यांसाठी सवलत दिली आहे. पावती सादर केली किंवा हमीपत्र दिले तरी प्रवेश द्यावा लागणार आहे. पण त्यांच्यापेक्षा मोठी अडचण बारावीनंतरच्या प्रवाशांची झाली आहे.

बारावीनंतरच्या इंजिनिअरिंग, बीएससी, ॲग्रीकल्चर, बीसीएस अशा विविध कोर्सेसना विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी ई डब्ल्यू एस, जातीचा दाखला, नॉनक्रीमिलयेर आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्याला ओपन मधून फॉर्म भरावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची पालकांची प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. किंवा प्रवेशही नाकारला जाऊ शकतो. तीच अवस्था डिप्लोमा व आयटीआय यांच्या प्रवेशासाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांची झाली आहे.

सोमेश्वर डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य एस. के. हजारे म्हणाले, डिप्लोमा, डिग्री व अन्य कोर्सला कागद अजूनही सक्तीचे आहेत. पोचपावतीवर प्रवेशाची सुचना नाही. डिप्लोमा, आयटीआय व बारावीनंतरच्या सर्व प्रवेशाना दाखल्याबाबत हमीपत्र ग्राह्य धरावे.

सेतूकेंद्रचालक प्रमोद पानसरे म्हणाले, दोन दिवसात एकही दाखला भरता आला नाही. विद्यार्थी व पालक हतबल झाले आहेत.

ऋतुजा दत्तात्रय कोकणे (कोऱ्हाळे ता. बारामती) म्हणली, पोर्टल ठप्प असल्याने मी 5 जूनपासून आजपर्यंत नॉनक्रिमीलेयर दाखला मिळाला नाही. डिप्लोमाची अर्ज भरण्याची आज शेवटची मुदत होती. त्याशिवाय प्रवेश घेतला प्रवेश मिळेल का? मी खुल्या गटात जाईल का? यास जबाबदार कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.