Maharani Yesubai : 'छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी महाराणी येसूबाईंचा आगमन दिवस शौर्यदिन म्हणून साजरा करू'

हिंदवी स्वराज्याच्या महाराणी येसूबाई (Maharani Yesubai) तब्बल ३० वर्षांनंतर औरंगजेबाच्या कैदेतून सुटून साताऱ्यात आल्या होत्या.
Maharani Yesubai
Maharani Yesubaiesakal
Updated on
Summary

स्‍वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व स्वराज्याच्या महाराणी येसूबाई यांना संभाजीराजेंच्‍या मृत्यूनंतर कैदेत टाकण्‍यात आले.

सातारा : हिंदवी स्वराज्याच्या महाराणी येसूबाई (Maharani Yesubai) तब्बल ३० वर्षांनंतर औरंगजेबाच्या कैदेतून सुटून साताऱ्यात आल्या होत्या. याला आज ३०४ वर्षे पूर्ण झाली.

Maharani Yesubai
Kolhapur : ..अखेर मुश्रीफांच्या मंत्रीपदाने 'त्या' फोटोंचे गुपित उलगडले; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

या घटनेचे स्मरण म्हणून महाराणी येसूबाई यांच्या श्रृंगारपूर येथील माहेरून आणलेल्या मातीचे आज पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याजवळ पूजन करण्‍यात आले.

महाराणी येसूबाई यांच्या सातारा आगमनाचा हा दिवस यापुढे शौर्यदिन म्हणून पाळणार असल्याची माहिती येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजेशिर्के यांनी दिली. यावेळी फाउंडेशनचे विश्‍वस्त धनश्री नितीन राजेमहाडिक, स्नेहल सुहास राजेशिर्के, शिल्पा सुरेश राजेशिर्के, सुधा सुभाष राजेशिर्के, जिज्ञासा मंचचे नीलेश पंडित, जयंत देशपांडे, माहुलीचे सरपंच प्रवीण शिंदे, उपसरपंच अविनाश कोळपे आदी उपस्‍थित होते.

Maharani Yesubai
Kagal Politics : 'सासूसाठी भांडत बसलो अन् सासूच वाट्याला आली'; मुश्रीफांच्या भूमिकेमुळं समरजितांची मोठी कोंडी

स्‍वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व स्वराज्याच्या महाराणी येसूबाई यांना संभाजीराजेंच्‍या मृत्यूनंतर कैदेत टाकण्‍यात आले. २९ वर्षे छत्रपती शाहू आणि महाराणी येसूबाई कैदेत होते. यानंतर ता. ४ जुलै १७१० मध्ये महाराणी येसूबाई कैदेतून सुटून साताऱ्यात परतल्या.

याचे स्मरण करण्यासाठी येसूबाई फाउंडेशनने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी येसूबाई यांचे माहेर असणाऱ्या श्रृंगारपूर येथून माती आणण्‍यात आली होती. या मातीचे पूजन करत येसूबाई यांना अभिवादन करण्‍यात आले. यानंतर माहुली येथील महाराणी येसूबाई यांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्‍यात आले.

Maharani Yesubai
Satara Politics : शरद पवार की अजित पवार? NCP पदाधिकाऱ्यांत द्विधावस्था; मुंबईत आज दोन्ही गटांची स्वतंत्र बैठक

सुहास राजेशिर्के यांनी महाराणी येसूबाई यांनी स्वराज्यासाठी केलेल्‍या त्‍यागाला तोड नाही. या त्‍यागाची नव्‍या पिढीला माहिती व्‍हावी, यासाठी हा दिवस यापुढील काळात शौर्यदिन म्हणून साजरा करणार असल्‍याचे सांगितले. याच अनुषंगाने अनंत इंग्लिश स्कूलमध्‍ये इतिहास संशोधक शिल्पा परब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.