Corona Update: धोका वाढला! राज्यातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ

देशातील पहिला मंकीपॉक्सचा रूग्ण केरळात सापडला आहे.
Corona Updates in Maharashtra
Corona Updates in Maharashtraesakal
Updated on

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यभरात दहा कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान काल राज्यात फक्त चार कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला होता. कालच्या तुलनेत आजच्या मृत्यूदरात अडीच पट वाढ झालेली आहे. तर आज राज्यात दोन हजार तीनशे एकाहत्तर नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. तर राज्यात दोन हजार नऊशे चौदा कोरोना रूग्णांना रूग्णालयातून सुटका मिळाली आहे.

(Maharashtra Corona Update)

Corona Updates in Maharashtra
औरंगाबादच्या नामांतरावर शिक्कामोर्तब; उद्या होणार अधिकृत घोषणा

दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. तर दिलासादायक गोष्ट अशी आहेत की आज सापडलेल्या कोरोना रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रूग्णांच्या रिकव्हरीचा दर हा ९७.९५ टक्के इतका झाला आहे. तर आजच्या १० कोरोना मृतांसहित राज्यातील मृत्यूदर हा १.८४ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल.

Corona Updates in Maharashtra
Video Viral: पुण्यातील टिळक रोडवर तरूणांची फ्री स्टाईल हाणामारी

आज राज्यात दोन हजार तीनशे एकाहत्तर नव्या कोरोना रूग्णांची भर पडली असून त्याचबरोबर देशात मंकीपॉक्सचाही धोका वाढला असून केरळमध्ये देशातील पहिला मंकीपॉक्सचा रूग्ण सापडला आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा सतर्क झाल्या असून नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य विभागानेही काळजी घेण्याचे अवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.