खूशखबर! आरोग्य विभागात जम्बो भरती, उद्या निघणार जाहिरात; आरोग्यमंत्र्यांची माहिती

Mega Bharti Notification: अनेक काळापासून राज्यातील आरोग्य विभागातील मोठ्या प्रमाणावर विविध पदं रिक्त होती.
Medical recruitment
Medical recruitment esakal
Updated on

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील आरोग्य विभागाची भरती रखडली होती. त्यामुळं सरकारी रुग्णालयांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं होतं. पण आता या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारनं आरोग्य विभागात १० हजार ९४९ पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी उद्याच जाहिरात देखील प्रसिद्ध केली जाणार आहे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली. (Jumbo recruitment as 11 thousand different posts in health department advertisement will be released tomorrow)

Medical recruitment
Fact Checker Zubair: यूपीतील शालेय मुलाला मारहाण प्रकरणी फॅक्ट चेकर झुबेरवर गुन्हा दाखल

सरकारवर दबाव होता

आरोग्य विभागातील भरतीसाठी खरंतर मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्येच जाहिरात निघाली होती. पण या भरती प्रक्रियेदरम्यान पेपरफुटीचा प्रकार घडला होता. त्यामुळं ही भरती प्रक्रिया रद्द झाली होती. (Latest Marathi News)

त्यानंतर सध्याच्या महायुतीच्या सरकारवर भरतीसाठी दबाव वाढत होता. त्यानुसार, आता ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. (Marathi Tajya Batmya)

Medical recruitment
Shah Rukh, Rashmika: शाहरुख, रश्मीका एकत्र काम करणार; चाहत्यांसाठी खास खबर

'या' पदांसाठी होणार भरती

आरोग्य विभागात होणाऱ्या भरती प्रक्रियेत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध ६० प्रकारची पदे मिळून एकूण १० हजार ९४९ पदांची केली जाणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मार्फत राबवली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री सावंत यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()