शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मार्चची भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचणार आहे. मार्चमधील अवकाळी पावसाची भरपाई सरकारकडून वितरीत करण्यात आली आहे. (Maharashtra Agriculture News 177 Crore Compensation To Farmers Who Suffered Losses Due To Unseasonal Rains )
शिंदे फडणवीस सरकारने २८ जिल्ह्यांना एकूण १७७.८० कोटींचा निधी वितरीत केला आहे. त्यासंदर्भात अधिक माहिती सीएमओ ट्विटद्वारे देण्यात आली आहे.
मार्च २०२३ मध्ये अवेळी पावसाने शेतीपिके व इतर नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले होते.
महसुली विभागनिहाय वितरीत निधी:
अमरावती विभाग - २४ कोटी ५७ लाख ९५ हजार,
नाशिक विभाग- ६३ कोटी ९ लाख ७७ हजार,
पुणे विभाग- ५ कोटी ३७ लाख ७० हजार,
छत्रपती संभाजी नगर- ८४ कोटी ७५ लाख १९ हजार.
एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अहमदनगर आणि धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं नुकसान झालेल्या भागाची मुख्यमंत्री आज पाहणी करणार आहेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.