मुंबई : कोरोनामुळे मागील दोन वर्षे होऊ न शकलेली महाराष्ट्र केसरी ही राज्यातील मानाची कुस्ती स्पर्धा यंदा ४ एप्रिलपासून साताऱ्यात आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी ‘सकाळ''शी संवाद साधताना दिली.
महाराष्ट्र केसरी ही प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रातील असंख्य युवा खेळाडूंसाठी महत्त्वाची समजली जाते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुस्तीपटू वर्षभर मेहनत घेत असतात. यंदा महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेकडून या स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत स्पर्धेचे ठिकाण व कालावधी याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचे नियम पाळले जाणार
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी जास्त कालावधी नाही, मात्र कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धा कशाप्रकारे खेळवण्यात येईल, असा प्रश्न बाळासाहेब लांडगे यांना केला असता ते म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोरोना संबंधित नियमांचे पालन करूनच खेळवण्यात येणार आहे, असे त्यांच्याकडून पुढे सांगण्यात आले.
९०० खेळाडूंचा सहभाग
महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा माती व गादी या दोन विभागात रंगणार आहे. या दोन्ही विभागांत मिळून ९०० कुस्तीपटूंचा सहभाग असणार आहे. तसेच १०० ते १५० पंच, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांचाही यामध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे एकूण एक हजार ते १२०० व्यक्तींसाठी सुविधा पुरवण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेसह आयोजकांवरही असणार आहे.
पात्रतेसाठी कमी दिवसांचा कालावधी
सध्या मार्च महिना सुरू आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र केसरी होणार आहे. आता महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेशी संलग्न जिल्हा व महानगरपालिकांतील खेळाडूंकडे प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कमी दिवसांचा कालावधी असणार आहे. पात्रता फेरीसाठी सज्ज होण्यासाठीही त्यांना पुरेसा वेळ मिळणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.