Arogya Bharti 2023 : 11 हजार जागांसाठी आरोग्य भरतीची जाहिरात निघाली; जुन्या परीक्षार्थींना पुन्हा करावा लागणार अर्ज

Maharashtra Arogya Bharti : या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया आज (29 ऑगस्ट 2023) दुपारी 3:00 वाजेपासून सुरू होणार आहे.
Arogya Bharti 2023
Arogya Bharti 2023eSakal
Updated on

आरोग्य भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रखडलेल्या भरती प्रक्रियेसाठी अखेर शासनाने जाहिरात जारी केली आहे. टी.सी.एस. आय.ओ.एन. या कंपनीमार्फत यासाठी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. यातून 10 हजार ९४९ पदं भरण्यात येणार आहेत.

यापूर्वी 2021 साली रद्द झालेल्या परीक्षेस जे विद्यार्थी उपस्थित होते. त्यांना या भरतीमध्ये पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार असल्याचं या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही जाहिरात जारी केली आहे.

Arogya Bharti 2023
Talathi Recruitment Exam : तलाठी भरती परीक्षेच्या नियोजनाचा फज्जा; विद्यार्थ्यांच्या दिले भलतेच केंद्र

नव्याने द्यावी लागणार परीक्षा

"शासन पत्र क्र. पद्म-2023/प्र.क्र.509/सेवा-5, दिनांक 31/7/2023 नुसार आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट क व ड पदभरतीकरिता यापूर्वी दिनांक 24 व 31 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या रद्द झालेल्या परीक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आता या परीक्षेसाठी आवश्यक परीक्षा शुल्क भरून नव्याने अर्ज करणे आवश्यक राहील." अशी माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. (Govt of Maharashtra)

परत मिळणार परीक्षा शुल्क

"दिनांक 24 व 31 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या रद्द झालेल्या परीक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी विभागाकडून सुविधा/ पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या पोर्टलमध्ये उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क भरल्याचा बँक तपशील भरून देण्यात यावा. विभागाकडून उमेदवारांनी भरलेली माहिती व मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा. लि. यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करून संबंधित पात्र उमेदवारांना शुल्क परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल." असं शासनाच्या जाहिरातीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

Arogya Bharti 2023
अखेर शिक्षक भरतीची तारीख फायनल! बिंदुनामावली अंतिम ५ सप्टेंबरपूर्वी उघडणार पवित्र पोर्टल; पण ‘इतक्याच’ जागांची भरती

वयोमर्यादेची समस्या

जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार, "दिनांक 24 व 31 ऑक्टोबर, 2021 चे परीक्षार्थी शिथिलक्षम व्याधिक्याची मर्यादा पार करत असल्यास ते या परीक्षेचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत अर्ज भरण्यासाठी पात्र राहतील व उर्वरित सर्व उमेदवारांसाठी दिनांक 3 मार्च, 2023 च्या शासन निर्णयानुसार वयोमर्यादितील शिथिलता अनुज्ञेय राहील."

एकाच दिवशी परीक्षा

शासन पत्र क्र. पदम 2020/प्र.क्र.1036/सेवा-5, दिनांक 22/8/2023 नुसार सदर पदभरती एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्याचे आयोजित आहे. यास्तव एका उमेदवाराने एका संवर्गासाठी एकाच परिमंडळात व इतर संवर्गासाठी तो अर्हताधारक असल्यास शक्यतो त्याच परिमंडळात अर्ज भरण्यात यावा.

Arogya Bharti 2023
Krushi Sevak Bharti 2023 : कृषिसेवक भरतीमुळे योजना शेतकऱ्यांना बांधावर! 2109 पदांची भरती जाहीर

आजपासून भरता येणार अर्ज

या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया आज (29 ऑगस्ट 2023) दुपारी 3:00 वाजेपासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची मुदत 18 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत असणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, पदनिहाय आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि निवडीची साधारण प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर (https://arogya.maharashtra.gov.in/) उपलब्ध असणार आहे. परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी या संकेतस्थळावर असणाऱ्या 'पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

Arogya Bharti 2023
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पोस्टात 38 हजारहून अधिक जागांसाठी बंपर भरती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.