पुणे - 'आम्ही फार इनकमिंग केले नाही, दार उघडले असते तर लोंढा आला असता. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, ज्यांचे नाव खराब आहे त्यांना आम्ही पक्षात घेतलेले नाही. व्यवस्थित फिल्टर लावला म्हणून उमेदवार निवडीची प्रक्रिया व्यवस्थित झाली आहे. नाहीतर, तुम्ही नावे ठेवली असते. आम्ही हाताने कपडे धुतो, आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही.' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला.