Assembly Election 2024: महायुतीमध्ये महाभारत! भाजप-राष्ट्रवादीत 'या' २१ जागांवरुन पेच; अनेकांची उमेदवारी धोक्यात

Ajit Pawar News: भाजप नेते हर्षवर्धन पाटील, समरजीत घाटगे आणि गणेश हाके यांनी आपला मुद्दा मांडला होता. तर अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी रविवारी भाजपचा आवाज बुलंद केला. पाटील आणि घाटगे हे इंदापूर आणि कागल विधानसभेसाठी इच्छूक होते.
Ajit Pawar|Eknath Shinde|Devendra Fadnavis
Ajit Pawar|Eknath Shinde|Devendra FadnavisESakal
Updated on

BJP-NCP Seat Allocation: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपासाठी बैठका सुरु आहेत. परंतु भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २१ जागांवरुन घोडं अडल्याचं बोललं जातंय. या २१ जागा त्याच आहेत जिथे २०१९ मध्ये दोन्ही पक्षांमध्ये बरोबरीची लढत बघायला मिळाली होती.

२१ जागांमध्ये बहुतांश जागा ह्या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत आणि दोन्ही पक्ष या जागांवर दावा ठोकत आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्यं संघर्ष पेटल्याचं दिसंतय. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एकमेकांच्या वैचारिक परंपरेचीही अडचण होत असल्याचं दिसून येतंय. दोन्ही बाजूंकडून नेते प्रतिक्रिया देत आहेत.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील, समरजीत घाटगे आणि गणेश हाके यांनी आपला मुद्दा मांडला होता. तर अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी रविवारी भाजपचा आवाज बुलंद केला. पाटील आणि घाटगे हे इंदापूर आणि कागल विधानसभेसाठी इच्छूक होते. या दोन्ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहेत. त्यामुळे पाटील पक्ष बदलू शकतात तर घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.

Ajit Pawar|Eknath Shinde|Devendra Fadnavis
ICG Helicopter Crashes: गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरचा अपघात; 3 जवान बेपत्ता

शरद पवारांच्या अत्यंत जवळचे असलेले निंबाळकर हे अजित पवारांच्या सोबत आहेत. आता ते पुन्हा शरद पवार गटाकडे जाण्याची तयारी दाखवत आहेत. त्याचं कारण भाजप नेते, रंजित सिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यासह सोलापूर आणि सातारा इथल्या स्थानिक नित्यांसोबत त्यांचे सूर जुळत नाहीत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या मैत्रीवर ते खूश नाहीत. सोलापूरचे अन्य दोन भाजप नेते उत्तमराव जानकर आणि प्रशांत परिचारक हेसुद्धा बदलत्या समीकरणांमुळे शरद पवारांच्या गटात जाण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातल्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाच्या २१ आमदारांनी २०१९ मध्ये भाजपविरोधात विजय मिळवला होता. तर काहींना फारच जवळून पराभव बघावा लागला होता. त्यामुळे हे लोक आपापल्या उमेदवारीसाठी अडून बसलेले आहेत. 'लाईव्ह हिंदुस्थान'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.