मुंबई - विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विरोधकांच्या महाविकास आघाडीने पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर (ईव्हीएम) खापर फोडले आहे. आघाडीने ‘ईव्हीएम’च्या विरोधात जनआंदोलन पुकारण्याचा निर्धार केला आहे.
विरोधी नेते त्यासाठी आपापसांत चर्चा करून आंदोलनाची रणनीती ठरवतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही मतपत्रिकांवरच मतदान घ्यावे, अशी मागणी करत त्यासाठी भारत जोडोच्या धर्तीवर मोठे अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे.