मुंबई - काँग्रेसने बुधवारी लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केल्यानंतर शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज ‘कुटुंबप्रमुखांचा वचननामा’ प्रसिद्ध केला. ज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीसह महिलांना अर्थसाहाय्य देण्याच्या पंचसूत्रीतील आश्वासनांचा उल्लेख आहे. त्याचबरोबर कोणत्याही धर्माच्या कारभारात सरकार अवाजवी, विनाकारण हस्तक्षेप करणार नाही असेही वचन देत सर्वधर्मीयांना दिलासा देण्यात आला आहे.