मुंबई - राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या (ता.२०) मतदानाची प्रक्रिया पार पडेल. प्रत्येक मतदाराला निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून राज्यभर प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. .एकट्या मुंबईत ३० हजार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून राज्यातील ९९० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. विविध भागांत राज्य पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जाणार असल्याची माहिती पोलिस मुख्यालयाकडून देण्यात आली आहे..आचारसंहितेच्या काळात ६५५.५३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात १५३ कोटी रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. त्यासोबत ६८.६३ कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा, ७२ कोटींचे अमली पदार्थ, २८२.४९ कोटींचे मौल्यवान धातू, ३.७८ कोटी रुपये मूल्य असलेल्या भेट वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत..गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि प्रवृत्ती असलेल्या सुमारे ८० हजार व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेतील कलमांनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे मुख्यालयाकडून सांगण्यात आले. राज्यात एकूण ७८ हजार २६७ शस्त्र परवाने जारी करण्यात आले आहेत. आचारसंहिता काळात यापैकी ५६ हजार ६०४ परवानाधारक शस्त्रे जमा करण्यात आली. तब्बल २ हजार २०६ अवैध शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत..दरम्यान आयोगाचे ‘सी-व्हिजिल ॲप’ आणि ‘एनजीएसपी’ पोर्टलवर आचारसंहिताभंगाच्या एकूण २२ हजार १९३ तक्रारी प्राप्त झाल्या असून १७ हजार ४८५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.निवडणुकीनिमित्त राज्यात ८५ हजार ९५९ पोलिस तैनात केले असून गृहरक्षक दलाचेही ७० हजार ४५० जवान तैनात करण्यात आले आहेत..जय्यत तयारी२८८ - मतदारसंघ९.७ कोटी - एकूण मतदार५ कोटी २२ हजार ७३९ - पुरुष४ कोटी ६९ लाख ९६ हजार - महिला४ हजार १३६ - रिंगणातील उमेदवार३ हजार ७७१ - पुरुष३६३ - महिला२ - अन्य२ लाख २० हजार ५२० - शाईच्या बाटल्या१ लाख ४२७ - एकूण मतदान केंद्रे४२६ - महिला नियंत्रित केंद्रे९९० - संवेदनशील केंद्रे.महायुती प्रचारातील मुद्देमाझी लाडकी बहीण योजनाबटेंगे तो कटेंगे (योगींची घोषणा)एक है तो सेफ है ( मोदींची घोषणा)व्होट जिहाद, धर्मयुद्ध.‘मविआ’ प्रचारातील मुद्देजातनिहाय जनगणनासामाजिक न्यायसंविधान बचाओअदानींचे प्रकल्प मतदानाची वेळ : सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंतमतमोजणी - २३ नोव्हेंबर#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.