पुणे - पश्चिम महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा महायुतीच्या पारड्यात पाहून घेण्यासाठी महायुती प्रयत्नात असताना काही मतदारसंघात बंडखोरीने ग्रासले आहे. तर काही ठिकाणी महायुतीची ताकद कमी पडत आहे. त्यापार्श्वभूमीवर आज पुण्यात भाजपच्या पश्चिम महाराष्ट्राच्या निवडणूक मुख्य समितीची (कोअर कमिटी) बैठक पार पडली. यामध्ये बंडखोरांना शांत करणे, जुन्या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे.